झुंडीने फिरताहेत ‘बिबटे’; दौंड तालुक्यातील CCTV फुटेज पाहून काळजाचा थरकाप उडेल!

Updated On:

दौंड – दौंड तालुक्यातील पारगाव येथे होले फार्म हाऊस समोर चार बिबट्याची झुंड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. यामुळे स्थानिक नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत.

दौंड तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची दशहत वाढताना दिसत आहे. एकाच वेळी बिबट्याची झुंडच फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आल्याने लोकांमध्ये एकच घबराट पसरली आहे.

दौंड तालुक्यातील पारगाव सालुमालु येथे दिलीप होले यांच्या शेतातील फार्म हाऊसवर रात्री चक्क चार बिबटे फार्म हाऊसच्या आवारात मुक्त संचार करताना दिसून आले. कुत्री भुंकू लागल्याने दिलीप होले बाहेर आले असता बिबटे दिसून आले नाही, मात्र शंका आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता बिबट्या असल्याचे कॅमेरात कैद झाले आहे.

पारगाव परिसरात बिबट्यांची दशहत वाढत चालली असुन शेतकऱ्यांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पिंजरा लावुन बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : दैनिक प्रभातचे छायाचित्रकार 'संदीप घोडके' यांचे निधन

2026-05-22 07:40:18

Pune News : दैनिक प्रभातचे छायाचित्रकार 'संदीप घोडके' यांचे निधन

Pune News : रिक्षाचालकांना मिळणार दहा हजार सन्मान निधी

2026-05-22 07:30:56

Pune News : रिक्षाचालकांना मिळणार दहा हजार सन्मान निधी

Pune News : शहरात रेबीज चा धोका नाही.! महापालिकेकडून आजारी कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेच पालन

2026-05-22 07:16:45

Pune News : शहरात रेबीज चा धोका नाही.! महापालिकेकडून आजारी कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेच पालन

Daund News: दौंड तालुक्यातील गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार उघड; डॉक्टरवर कारवाई होणार का? नागरिकांचा सवाल....

2026-05-10 12:19:14

Daund News: दौंड तालुक्यातील गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार उघड; डॉक्टरवर कारवाई होणार का? नागरिकांचा सवाल....

बिबट-मानव संघर्ष कमी करण्यासाठी सहजीवनाचा मार्ग स्वीकारणे गरजेचे – सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस

2026-05-07 19:32:48

बिबट-मानव संघर्ष कमी करण्यासाठी सहजीवनाचा मार्ग स्वीकारणे गरजेचे – सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस