“बस झालं ‘इंडिया’ म्हणणं आता ‘भारत’ म्हणा”; संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळेंचे देशाच्या नावावरून मोठे विधान

Dattatreya Hosabale On Two Name Of County । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी देशाच्या नावावरून एक विधान केले आहे. ते विधान सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. ‘विमर्श भारत का’ या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान दत्तात्रेय होसबळे यांनी देशाला भारत आणि इंडिया या दोन नावांनी हाक मारण्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी यावेळी,” आपल्या देशाला भारत म्हटले पाहिजे, इंडिया नाही.” असे म्हटले आहे.
दत्तात्रेय होसबळे यांनी या कार्यक्रमात, “जी-२० शिखर परिषदेदरम्यान राष्ट्रपतींच्या निवासस्थानी होणाऱ्या मेजवानीसाठी पाठवलेल्या निमंत्रणात ‘भारताचे प्रजासत्ताक’ असे लिहिले होते. देशाला ‘इंडिया’ नाही तर ‘भारत’ म्हटले पाहिजे कारण इंग्रजीत ते ‘इंडिया’ आहे आणि भारतीयांसाठी ते ‘भारत’ आहे. जगात कुठेही हे घडू शकते का?” असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
संविधानापासून रिझर्व्ह बँकेच्या नावावर प्रश्न उपस्थित Dattatreya Hosabale On Two Name Of County ।
दत्तात्रय होसबळे यांनी यावेळी, “भारतीय संविधान, भारतीय रिझर्व्ह बँक… या सर्वांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे. ते म्हणाले की भारताला भारतच राहू दिले पाहिजे.” असे त्यांनी म्हटले. तसेच पुढे बोलताना त्यांनी,” मुघल काळात देशाला खूप नुकसान सहन करावे लागले; संस्कृती, स्वाभिमान, शिक्षण आणि उद्योग सर्व नष्ट झाले.” असे सांगितले.
‘संविधानाबद्दल दिशाभूल करणाऱ्या गोष्टी पसरवल्या ‘
दत्तात्रेय होसबळे यांनी संविधांविषयी बोलताना, “भारताच्या संविधानाबाबत अनेक दिशाभूल करणाऱ्या गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. असे म्हटले जाते की, “भारत हा फक्त शेतीप्रधान देश आहे, याठिकाणी दुसरा कोणताही उद्योग नाही, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. १६०० च्या सुमारास, जागतिक व्यापारात भारताचा वाटा २३ टक्के होता, जो केवळ शेतीचा नव्हता. प्राचीन काळी आपण कोणत्याही क्षेत्रात कोणापेक्षा कमी नव्हतो, परंतु बाह्य आक्रमकांनी आपल्या देशाला दडपले.” अशी माहिती त्यांनी दिली.
‘इतिहास विकृत पद्धतीने सादर केला गेला’ Dattatreya Hosabale On Two Name Of County ।
दत्तात्रेय होसबळे यांनी आपल्या इतिहासाबद्दल बोलताना, “भारत आज स्वतंत्र आहे, त्याचे मनही स्वतंत्र आहे. सुरुवातीच्या दशकांमध्ये असे शिकवले जात होते की गणित आणि विज्ञान क्षेत्रात भारताचे कोणतेही योगदान नाही, परंतु भारताचा इतिहास विकृत पद्धतीने सादर केला जात होता. भारताचा इतिहास समृद्धीने भरलेला आहे. विशेष म्हणजे जगातील अनेक लोक भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगतात.” असे म्हटले.





