Dattatreya Bharane : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! येत्या 10 दिवसांत कर्जमाफी होणार; कृषीमंत्र्यांची माहिती
Dattatreya Bharane : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येणाऱ्या 10 दिवसात कर्ज माफी होणार असल्याचे जाहीर केले.

Dattatreya Bharane : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन गेल्यावर्षी राज्य सरकारने विधानसभेत दिले होते. त्यानंतर आज राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी घोषणा केली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी येणाऱ्या 10 दिवसात कर्ज माफी केली जाईल असे जाहीर केले.
अहिल्यानगर येथे आयोजित कार्यक्रमातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले की, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे. येत्या ८ ते १० दिवसांत ही कर्जमाफी पूर्ण केली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की, पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांच्या नावाने यावर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी जाहीर केली आहे. येणाऱ्या आठ-दहा दिवसात अहिल्यादेवींच्या नावाने जे कर्ज माफी आहे येणाऱ्या दहा दिवसांमध्ये कर्जमाफी केली जाईल, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा वहिनी यांची परवानगी घेऊन मी आपल्या सगळ्यांना सांगतो असंही पुढे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना काय?
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची घोषणा केली.
त्यानुसार, 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बँकेने दिलेले दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज राज्य सरकार माफ करणार आहे.
हेही वाचा:






