दत्तात्रय कुंडलिक यांचा महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्काराने गौरव

शिरूर : सरदवाडी (ता.शिरूर ) येथील दत्तात्रय कुंडलिक यांना नुकताच महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पुणे येथे नुकतेच स्विफ्ट अन् लिफ्ट यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच उद्योगात गगनभरारी घेणाऱ्या यशस्वी मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
शिरूर तालुक्यात विजय हिंदू या नावाने कुंडलिक यांचे हॉटेल असून येथील भेळ ही सातासमुद्रापार गेली आहे.राज्यातील अनेक राजकीय नेते पुणे नगर महामार्गावर जात असताना नेहमी येथील भेळीचा आस्वाद घेतात. तर परदेशात ही भेळ मागणीनुसार पाठवली जात आहे.
पिंपरी चिंचवड येथे नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला.या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या हस्ते दत्तात्रय कुंडलिक,निखिल कुंडलिक यांना महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने राज्यभरातून उद्योजक उपस्थित होते.





