Dattatray Bharne : 5 जुलैपासून शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ; कृषीमंत्र्यांची घोषणा
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना 5 जुलैपासून मिळणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले.

Dattatray Bharne : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना ५ जुलैपासून मिळणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले.
त्यामुळे जूनअखेर कर्जमाफी देण्याचा सरकारचा वायदा फसला आहे. कृषी विभागावरील पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना भरणे यांनी ही घोषणा केली. शेतकरी कर्जमाफी ३० जून पूर्वी कर्जमाफी दिली जाईल, असे सरकारने (Dattatray Bharne) सांगितले होते.
आपण पुरवणी मागण्यात कर्जमाफीच्या रकमेची तरतूद केली आहे. आज आपण पुरवणी मागण्यांवर चर्चा करत आहोत, आता या पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर त्या स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जातील. त्यामुळे ५ जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम अदा केली जाईल, असे भरणे यांनी कर्जमाफीची रक्कम मिळण्यास होणाऱ्या उशीराबाबत बोलताना सांगितले.
जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या प्राथमिक अंदाजानुसार ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची रक्कम त्यासाठी लागणार आहे. कर्ममाफीच्या योजनेतील अटीत (Dattatray Bharne) बदल करण्याची, त्यात सुधारणा करण्याची मागणी अनेक आमदारांनी केली आहे. यात बदल करू, त्यासंदर्भात उपसमिती सकारात्मक निर्णय घेईल असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे.
आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी आहे. विरोधकांकडून भ्रम निर्माण केले जात आहे की, आम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही. आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत, आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी असल्याचे त्यांनी यासंदर्भात विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देताना सांगितले.






