सुंदरबाई मराठे विद्यालयामध्ये घडले पालखीचे दर्शन ..

Updated On:
सुंदरबाई मराठे विद्यालयामध्ये घडले पालखीचे दर्शन ..

पुणे  – महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी समजली जाते. याच संत परंपरेतून संत वाडमयाच्या नव्या अंकुराने जन्म घेतला असून या संत परंपरेला नवे अंकुर फुटत असून नव्या पिढीला एक नवी प्रेरणा मिळत आहे. मात्र कोरोनामूळे गेल्या दोन वर्षापासून पंढरीची आस असूनही नाईलाजास्तव वारकरी आणि नव्या पिढीमध्ये मरगळ आली आहे. ही मरगळ झटकली जावी आणि संत परंपरेचे जतन व्हावे यासाठी गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या खराडी येथील सुंदर बाई मराठे विद्यालयात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/4138102269600516

स्थानिक भाविकांनीही हरिनामाच्या गजरात या पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. विठूराया आम्हाला काही नको पण आंमची शाळा लवकर सुरु कर असे साकडे यावेळी विध्यार्थ्यानी विठ्ठलाला घातले.

हा पालखी सोहळा दैदीप्यमान व्हावा व विद्यार्थ्याच्या मनावर संताच्या शिकवणीचे व संत वचनांचे संस्कार व्हावेत या हेतूने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.रामभाऊ मोझे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. संत ज्ञानेश्वर, संत तूकाराम महाराज,संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषेतील बालचमूनी आणि संत साहित्यातील ग्रंथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर मोझे, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा प्रा. अलका पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.संजय सोमवंशी,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता भोसले,  शिक्षिका रंजना पवार, सविता ढेरगे, शुभांगी महापुरे, राजेश दरेकर, शशीकला रोहोकले,राजेश औटी आणि राजू सोमवंशी आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : पोलीस मित्र संघटनेतर्फे पालख्यांचे स्वागत

2026-07-09 21:29:40

Pune News : पोलीस मित्र संघटनेतर्फे पालख्यांचे स्वागत

Khadakwasala Dam : खडकवासला धरणाचा विसर्ग बंद; चारही धरणांमध्ये 16.17 टीएमसी पाणीसाठा

2026-07-09 18:00:22

Khadakwasala Dam : खडकवासला धरणाचा विसर्ग बंद; चारही धरणांमध्ये 16.17 टीएमसी पाणीसाठा

Pune News : रक्षकच बनले भक्षक ! पर्यटकांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या खंडाळा हायवे पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश

2026-07-09 16:48:22

Pune News : रक्षकच बनले भक्षक ! पर्यटकांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या खंडाळा हायवे पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश

Pune : पु. ना. गाडगीळ अँड सन्सच्या 'रेवा डायमंड्स'चे तिसरे एक्सक्लुझिव्ह शोरूम हडपसरमध्ये सुरू

2026-07-09 11:34:30

Pune : पु. ना. गाडगीळ अँड सन्सच्या 'रेवा डायमंड्स'चे तिसरे एक्सक्लुझिव्ह शोरूम हडपसरमध्ये सुरू

Pune News : पंढरीच्या वारकऱ्यांसाठी 'डॉ दुधभाते नेत्रालय आणि आर टी ओ पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिर

2026-07-08 17:04:30

Pune News : पंढरीच्या वारकऱ्यांसाठी 'डॉ दुधभाते नेत्रालय आणि आर टी ओ पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिर