satara | धैर्या कुलकर्णीचा गुरूकुलतर्फे सत्कार

सातारा (प्रतिनिधी) – येथील गुरूकुल स्कूलची विद्यार्थीनी धैर्या विनोद कुलकर्णी हिने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या बाराव्या वर्षी एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प सर केला. याबद्दल धैर्याचा गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी सत्कार केला.
यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सौ. सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र चोरगे म्हणाले, धैर्या कुलकर्णी पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणारी देशातील पहिलीच मुलगी ठरल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गुरूकुलचे विदयार्थी अभ्यासाबरोबरच इतरही अनेक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतात व यश संपादन करतात. विदयार्थी अटपैलू होण्यासाठी शिक्षक सदैव तत्पर असतात.
तिच्या या यशाबद्दल तिचे आनंद गुरव, अर्जुन चोरगे, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दीपक मेथा, जगदीश खंडेलवाल, हरिदास साळुंखे सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.





