nagar | दरेवाडीतील सरपंच, सदस्यांचे पंचायत समितीसमोर उपोषण

नगर, (प्रतिनिधी) – दरेवाडी ग्रामपंचाय मधील १५ व्या वित्त आयोग योजनेचे विविध विकास कामे परवानाधारक ठेकेदार जाणीवपूर्वक कामे करत नाही. याबाबत अनेक वेळा जिल्हा परिषद व पंचायत समितीला पत्रव्यवहार केला आहे. मात्र याकडे प्रशासनाने ही दुर्लक्ष केले आहे. या घटनेच्या निषेधार्थ सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर उपोषण करण्यात आले.
यावेळी दरेवाडीच्या सरपंच सरपंच स्वाती बेरड, सुभाष बेरड, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र बेरड, बाबासाहेब वीर, एकनाथ ससे, अक्षय भिंगारदिवे, बाबासाहेब करांडे, संदीप सपकाळ, आशा निंबाळकर, आकाश बडेकर, परमेश्वर बेरड, देविदास करांडे, राजेंद्र रासकर, सुनील बेरड, दीपक घोलप, विजय मोरे, शिवाजी बेरड, बद्रीनाथ बेरड, रमेश बेरड, सागर बेरड, नितीन रासकर, रमेश बेरड, श्रीकांत जगताप, राजू वाकळे, रोहिदास शिंदे, सुनील बेरड, संजय भिंगारदिवे, गोरख बेरड, निखिल बेरड आदी उपस्थित होते.
दरेवाडीत १५ वा वित्त आयोग योजने अंतर्गत विविध विकास कामे गावठाण बाजार तळ, शौचालय बांधकाम करणे, मुस्लिम समशानभूमीत तार कंपाऊंड करणे, गोकुळवाडी येथील समशानभूमी ओपन स्पेस परिसर तार कंपाऊंड करणे, गावठाण अंगणवाडी दुरुस्ती करणे,
इमारत पाऊस पाणी संकलन करणे, अंगणवाडी इमारतीस पत्रा शेड करणे, जि. प. शाळा वाचनालय बांधणे व पाण्याची टाकी जवळ खोली बांधण्याच्या कामासाठी संबंधित ठेकेदार हा दुर्लक्ष करत असून याची जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे तक्रार केली होती.





