दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार सदानंद कदम ‘ईडी’च्या कोठडीत
Updated On:

मुंबई – दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना ईडीने 15 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. सलग चार तास चौकशीनंतर कदम यांना शुक्रवारी ईडीने अटक केली होती. सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे.
तसेच ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रूपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे. तर सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचेही ईडीने म्हटले आहे. ईडीचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला आहे. मात्र, ईडीने 14 दिवसांच्या कोठडीची मागणी फेटाळली आहे.





