Danish Malewar : कोण आहे दानिश मालेवार? ज्याने दुलीप ट्रॉफीत द्विशतक झळकावत रचला इतिहास

Who is Danish Malewar : विदर्भाचा 21 वर्षीय फलंदाज दानिश मालेवार याने दुलीप ट्रॉफीच्या पदार्पण सामन्यात दुहेरी शतक ठोकत इतिहास रचला आहे. सेंट्रल झोनविरुद्ध खेळताना नॉर्थ झोनच्या दानिशने 203 धावांची शानदार खेळी केली आणि दुलीप ट्रॉफीत विदर्भासाठी दुहेरी शतक ठोकणारा पहिला खेळाडू बनला. या खेळीसह त्याने अवघ्या 16 डावांत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठला. हा विक्रम यशस्वी जैस्वाल, रुसी मोदी आणि अमोल मजूमदार यांनी 13 डावांत केला आहे.
कोण आहे दानिश मालेवार?
नागपुरात जन्मलेला दानिश तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि त्याच्या शांत स्वभावामुळे त्याची तुलना राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांच्याशी केली जाते. 2024 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दानिशने अल्पावधीतच आपली छाप पाडली. 2024 च्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने 783 धावा केल्या, ज्यात केरळविरुद्धच्या अंतिम सामन्यातील 153 धावांची महत्त्वपूर्ण खेळी समाविष्ट आहे. या खेळीने विदर्भाला तिसरा रणजी खिताब मिळवून दिला.
21-year-old Danish Malewar smashed a double ton in the Duleep Trophy, while Yash Rathod remained unbeaten on 87 before declaring the innings! 🤍💪#DuleepTrophy #DanishMalewar #YashRathod #Sportskeeda pic.twitter.com/5sCZ02wzOj
— Sportskeeda (@Sportskeeda) August 29, 2025
पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज –
तो हंगामात यश राठोड आणि करुण नायर यांच्यानंतर विदर्भासाठी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. सेमीफायनलमध्ये मुंबईविरुद्ध 79 धावांची झुंजार खेळी आणि अंतिम सामन्यातील शानदार प्रदर्शनाने त्याने सर्वांचे लक्ष वेधले. हंगामात त्याची सरासरी 52.20 इतकी होती. यासह तो हंगामातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
हेही वाचा – Lalit Modi : हरभजनने श्रीसंतला मारली होती चापट! 18 वर्षांनंतर पुन्हा VIDEO व्हायरल, नेमकं कारण काय?
केवळ 10 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने पाच वेळा 50 हून अधिक धावा केल्या आणि अनेकदा शतकांत रूपांतरित केल्या. त्याची सरासरी 65 पेक्षा जास्त आहे. निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या दानिशसाठी ही यशस्वी वाटचाल सोपी नव्हती. दानिशच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याच्याकडून भविष्यात आणखी मोठ्या यशाची अपेक्षा आहे.





