Danielle McGahey : कॅनडाकडून खेळणार पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू; आयसीसीचे निकषही केले पूर्ण…

टोरांटो :- कॅनडाची डॅनिले मॅकगाहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटपूट ठरणार आहे. ती बांगलादेश मध्ये होणाऱ्या महिलांच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामन्यात कॅनडाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
29 वर्षाची डॅनिली हीने आयसीसीचे याबाबतचे निकष पूर्ण केल्यानंतरच तीची कॅनडाच्या संघात निवड झाली आहे. ही पात्रता फेरी येत्या सोमवारपासून 11 सप्टेंबरपर्यंत लॉस एंजिलिस येथे होणार आहे.
आधी पुरूष असलेला डॅनी आता डॅनिली या नावाने ओळखला जात आहे. पुरुषाची महिला बनलेल्या खेळाडूसाठी आयसीसीचे काही नियम आहेत. या सर्व नियमातील निकष तीने पूर्ण केले आहेत. त्यामुळेच आयसीसीने तिला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची परवानगी दिली आहे.
जागतिक पात्रता फेरीत अमेरिकन क्वालिफायरमध्ये कॅनडाचा सामना हा अर्जेंटिना, ब्राझील आणि अमेरिकेशी होणार आहे. डॅनली ही 2020 सालच्या फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियावरून कॅनडा येथे आली. तिने नोव्हेंबर 2020 साली पुरूषापासून महिला बनण्याची शस्त्रक्रीया तसेच वैद्यकीय बदलही करुन घेतले.
काय असतात निकष…
जगभरातील कोणत्याही पुरुष खेळाडूला महिला बनल्यावर क्रिकेटपटू म्हणून सज्ज होण्यासाठी आयसीसीचे निकष पूर्ण करावे लागतात. तसेच याबाबतच्या सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्याची करुन घ्याव्या लागतात. पुरुषाची महिला बनलेल्या क्रिकेटपूटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी शरिरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी सलग 12 महिने ठरावीक स्तरावरच असल्याचे सिद्ध करावे लागते. त्यानंतरच तीला आयसीसीकडून परवानगी मिळते.





