मुंबई – हॉलीवूडमध्ये 2021 साली सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये डॅनिएल क्रेगने ड्वेन जॉन्सनला मागे टाकले आहे. त्याने वर्षभरात तब्बल 100 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे.
व्हरायटीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये त्याचा क्रमांक आता अगदी वरचा लागला आहे. रियान जॉन्सन यांच्या “नाईव्हज आऊट 2′ आणि “नाईव्ज आऊट 3′ या दोन सिनेमांमधून डॅनिएल क्रेगने ही कमाई केली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या ड्वेन जॉन्सनने “रेड वन’ या अमेझॉन हॉलिडेच्या ऍक्शन फिल्ममधून 50 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. ड्वेन जॉन्सनच्या पाठोपाठ विल स्मिथ, आणि डेनझोल वॉशिंग्टन यांचा क्रमांक लागतो आहे.
या दोघांनीही अनुक्रमे “किंग रिचर्ड’आणि “द लिटील थिंग्ज’ या आपापल्या सिनेमांमधून 40 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. लिओनार्डो दीकॅप्रिओ आणि मार्क वालबर्ग यांनी “डन्ट लुक अप’ आणि “पेन्सर कॉन्फिडेन्शियल’ या नेटफ्लिक्सवरील
सिनेमांमधून 30 दशलक्ष डॉलरोची कमाई केली आहे. सहाव्या क्रमांकावर जेनिफर लॉरेन्स आहे. तिने देखील “डन्ट लुक अप’मधून 25 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. यानंतर ज्युलिया रॉबर्टस, सॅन्ड्रा बुलक आणि रॅयान ग्लोसिंग यांचा क्रमांक लागतो आहे.