आरारा खतरनाक..! रातोरात स्टार झालेल्या सिलेंडर मॅनला प्रवीण तरडेंकडून चित्रपटात संधी

मुंबई – सोशल मीडियाने आजपर्यंत अनेकांना रातोरात स्टारडम मिळवून दिले आहे. तर कोणाचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. असेच काही एका तरूणाच्या बाबतीत घडले असून त्याच्या एका फोटोने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली आहे. एवढेच नाही तर त्याचे कौतूक अनेक मोठ्या व्यक्तींनी केले आहे.
अंबरनाथ मधील सागर जाधव गॅस वितरण करत असल्याने त्याची गॅसवाला अशी ओळख होती. एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याला लाजवेल असा देखणा चेहरा आणि पिळदार शरीरयष्टीमुळे सागर सोशल मीडियावर इतका लोकप्रिय झाला की त्याने चित्रपटात काम करावं, असं अनेकांना वाटून गेलं.
दरम्यान, लवकरच सागरची ही इच्छा पूर्ण होईल असं दिसतंय. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रवीण तरडे यांनी सागरला त्यांच्या आगामी चित्रपटात भूमिका देण्याचं आश्वासन दिलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेन याबाबत माहिती दिली आहे.
सागर सिलेंडरच्या टेम्पोला टेकून उभा असताना त्यांच्या नकळत एक तरुणाने त्याचा फोटो क्लिक केलाहोता . हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे आज सागरची ओळख बदलली आहे. सागर आता साधासुधा गॅसवाला नसून ‘सिलेंडर मॅन’ अशी त्याची ओळखलं झाली आहे.





