Blood clot due to corona | करोनामुळे होताहेत रक्तात ‘धोकादायक’ गुठळ्या

नवी दिल्ली – कोविड 19 मध्ये केवळ फुफ्फुसाला संसर्ग होतो असे नाही तर त्यामुळे रक्ताच्या धोकादायक गुठळ्या ( Blood clot ) होत असल्याचे आढळून आले आहे. काही घटनांमध्ये त्या अत्यंत तातडीने काढून रुग्णाला वाचवावे लागले आहे.
जागतिक अभ्यासानुसार या रक्ताच्या गुठळ्या होण्याचे कमाल प्रमाण रुग्णालयात दाखल झालेल्या बधितांमध्ये 14 ते 28 टक्के आहे. तर किमान प्रमाण दोन ते पाच टक्के आहे. भारतातही फुफ्फुसाप्रमाणे रक्तवाहिन्यातील संसर्ग तेवढ्याच प्रमाणात आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
करोना होऊन गेल्यानंतर रक्तात गुठळ्या होण्याचा विकार होण्यांची शक्यता सामान्य माणसाच्या तुलनेत 100 पट अधिक असते, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात आढळून आले. हा अभ्यास एप्रिल महिन्यात प्रकाशित झाला. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीत आशा गुठळ्या ( Blood clot ) हा आजार झालेल्या 30 टक्के जणांना बाधा झाल्याचे आढळून आले.
पाच लाख करोना बाधितांचा यात अभ्यास करण्यात आला. हा धोका दहा लाखांत 39 लोकांत आढळून आला.





