धर्मासाठी बॉलीवूड सोडलेली ‘दंगल’ गर्ल अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह

Zaira Wasim | ‘दंगल’ चित्रपटातील अभिनेत्री जायरी वसीम लग्नबंधनात अडकली आहे. जायराने वयाच्या २४ व्या वर्षी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे. सध्या तिची पोस्ट व्हायरल होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जायरा वसीमने सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये ती निकाहनामा साईन करताना दिसत आहे. तिच्या हातावर मेहंदीचा गडद रंग चढलेला दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत ती आपल्या पतीसोबत उभी आहे. दोघंही आकाशात चंद्राकडे पाहत आहेत. यामध्ये जायराने लाल रंगाचा गोल्डन वर्क असलेला लेहेंगा घातला आहे. ‘कुबूल है X3’ असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. Zaira Wasim |
View this post on Instagram
जायरा व तिचा पती दोघांचाही चेहरा यात दिसत नाही. त्यामुळे झायरा वसीमचा पती कोण आहे, त्याबद्दल माहिती अद्याप समोर आलेली नाही. Zaira Wasim |
दंगल चित्रपटात जायराने सिनेमात छोट्या गीता फोगाटची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने काही सिनेमे केल्यानंतर २०१९ साली फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला आणि इस्लाम धर्माचा मार्ग स्वीकारला. झायरा वसीमने दंगल, द स्काय इज पिंक, सिक्रेट सुपरस्टार, स्नो फ्लॉवर्स या सिनेमात काम केले. मात्र आता तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. Zaira Wasim |
हेही वाचा:
आरबीआयच्या सोन्याच्या साठ्याने मोडले सर्व विक्रम ; पहिल्यांदाच १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला





