बारामतीत शुक्रवारी रंगणार ‘दांडिया’ महोत्सव

बारामती – नवरात्र उत्सवानिमित्त बारामती शहरात दैनिक “प्रभात’ व एडीएस फिटनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि. 20) शहरातील भिगवण रोडवरील चिराग गार्डन येथे “भव्य पारंपारिक दांडिया’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रॅडिशनल पद्धतीने आयोजन केलेल्या दांडिया महोत्सवाकडे संपूर्ण बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
शहरातील भिगवण रस्त्यावरील चिराग गार्डन येथे सायंकाळी 6 वाजता दांडिया महोत्सवास सुरुवात होईल. रात्री 10 वाजेपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. यंदाच्या दांडियात नेटके आयोजन करण्यात आले आहे. दैनिक प्रभातकडून मागील तीन वर्षांपासून दांडिया महोत्सवात नेटके नियोजन होत असल्याने शहरवासियांनी कौतुक केले आहे.
दांडिया महोत्सव शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल याची खात्री आयोजकांनी दिली आहे. उत्सव साजरा करताना त्याचा प्रशासनासह सामान्य नागरिकांना देखील कसलाही त्रास होणार नाही, याची उत्तम व्यवस्था दैनिक “प्रभात’ व ए डी एस फिटनेस ग्रुपने घेतली आहे, अशी माहिती दैनिक प्रभातचे बारामती तालुका प्रतिनिधी प्रमोद ठोंबरे व एडीएस फिटनेस ग्रुपच्या संचालिका ऐश्वर्या शिंदे यांनी दिली.
दैनिक प्रभातच्या वतीने बारामती शहरातील तरूणाईसह महिलांसाठी भव्य दांडिया महोत्सव आयोजित केला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा महोत्सव बारामती शहराचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. त्यामुळे अवघी तरूणाई या महोत्सवाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. यंदा प्रभातच्या वतीने भव्य दांडिया महोत्सव बारामतीकरांसाठी आकर्षण ठरले आहे. शहरातील नामाकिंत प्रायोजकांच्या सहकार्याने हा भव्य दांडिया महोत्सव नवपर्वणी करणारा ठरणार आहे. त्यामुळे तरूणाईची उत्सुकता शिगेला पोहोचली असून बारामती शहरात प्रभातच्या दांडिया महोत्सवाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
येथे संपर्क साधावा
दैनिक ‘प्रभात’ व एडीएस फिटनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दांडिया महोत्सवात सहभागी होण्यासाठी संपर्क दैनिक प्रभात 9552512912, एडीएस फिटनेस 7350768410
प्रायोजक
सोहम एंटरप्राइजेस बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स, चव्हाण बिल्डर्स, आदित्य ग्रुप बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स, मेहता हॉस्पिटल, आचार्य ऍकॅडमी, खत्री खाटमोडे बिल्डकॉन, मुक्ताई टेक्स्टाइल, अष्टेकर ज्वेलर्स, वायकेइ बाईक, डांझो फिट सेंटर, लॅक्मे, सलून एप्पल, प्रवीण कॉस्मेटिक, राजमंदिर आईस्क्रीम, दुर्वांकुर मोबाइल. प्रोमॅक्स मोबाईल.





