पिंपरी | क्रीडा प्रबोधिनी विद्यालयात देशभक्तीपर गीतावर नृत्याचे सादरीकरण
Updated On:

इंद्रायणीनगर, (वार्ताहर)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाचे ध्वजारोहण प्राचार्य जयराम वायळ यांच्या हस्ते झाले.
ध्वजारोहणानंतर सर्व विद्यार्थी,कर्मचारी व उपस्थित पालकांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. त्यांनतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
क्रीडा शिक्षक ऋषिकांत वचकल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमाकरिता विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रियंका येवले सदस्य अनिल कांबळे, शिला डोंगरे तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते.



