पिंपरी | भोसरी एमआयडीसीत सुविधांचा अभाव

इंद्रायणीनगर, (वार्ताहर) – भोसरी औद्योगिक परिसरातील एस. ब्लॉकमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे उद्योजकांची गैरसोय होत आहे. भोसरी एमआयडीसी नावाजलेला परिसर रोडवर पडलेला राडारोडा व कचर्याने व्यापून गेला आहे. तर रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठे खड्डे पडले असल्याने कांही ठिकाणी गुडघाभर पाणी साठत आहे.
त्यामुळे कंपनीत येणार्या कर्मचार्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीत मूलभूतसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी उद्योजक व कर्मचारी करत आहेत.
एमआयडीसीत एस ब्लॉक मध्ये पुणे टेक्ट्रॉल प्रा. लि. च्या समोरील 30 फुटी रस्त्यावर कंपनीच्या समोरील बाजूस दररोज मोठ्या प्रमणावार कचरा टाकला जात आहे. हा कचरा हॉटेल, रेस्टॉरंट व कंपन्यांचा असल्याचा दिसून येतो. या घाणीमुळे परिसरातील कर्मचार्यांच्याआरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बरेच कर्मचारी ताप, अंगदुखी व चिकन गुण्यासारख्या साथीच्या आजारांनी त्रस्त आहेत. कंपनी समोर अक्षरशः कचर्याचे डम्पिंग ग्राउंड केले आहे. कंपनीसमोरील 30 फुटी रस्त्यांपैकी 20 फूट कचरा डांबरी रस्त्यावर आला आहे. त्यामुळे दोन चारचाकी गाड्याही पास होत नाहीत रस्त्यावरील मोठ्या मोठ्या दगडामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
हॉटेल श्री यश ते एस. बी. कॅन्टीनपर्यंत रस्त्याची काही दिवसांपूर्वी झालेल्या केबलच्या खोदकामामुळे दुरवस्था झाली आहे याबाबत सारथीवर तक्रारी दाखल करूनही प्रतिसाद मिळत नाही.
कांही वेळा सारथीवर तक्रार केल्यावर अधिकारी पाहणी न करता व काम पूर्ण न करता तक्रार बंद करत सल्याचा तक्रारदारांचा अनुभव आहे. या परिसरातील राडारोडा व कचरा ताबडतोब उचलण्याची मागणी उद्योजक करीत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला केवळ उद्योगांकडून वेगवेगळ्या प्रकारचा महसूल हवा आहे. या उद्योगांना मुलभूत सुविधा पुरविण्याची आमची जुनी मागणी आहे.
त्याकडे मात्र लक्ष द्यायला महापालिका प्रशासन तयार नाही. उद्योगांना भेट देणार्या देश, परदेशातील शिष्टमंडळांना दिसणारे हे आंगाळवाणे दृश्य महापालिकेची प्रतिमा मलीन करणारे आहे. संदीप बेलसरे – अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना





