दुभाजकात ट्रक घुसल्याने अपघातात ओगलेवाडीत लाखो रुपयांचे नुकसान
Updated On:

कराड – ओगलेवाडी ता. कराड येथे गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर विटयाहून कराडकडे येणारा ट्रक महामार्गावरील दुभाजकात घुसल्याने अपघात झाला. या अपघातामुळे एक एल. ई. डी. लॅंम्पचा खांब पडल्याने सुमारे दीड ते दोन लाख रूपयांचे नुकसात झाले आहे. तसेच ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. रविवार, दि. 15 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सिमेंट वाहतूक करणारा ट्रक विटयाहून कराडकडे निघाला होता. ओगलेवाडी येथील मुख्य चौकानजीक काम सुरू असलेल्या दुभाजकात ट्रक घुसला. यामुळे दुभाजकात नव्याने बसवण्यात आलेला एक एल. ई. डी. लॅंपचा खांब मोडून पडला. तर या अपघातात ट्रकचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.





