‘वेलकम ३’ चित्रपटात दिसणार ‘दलेर मेहंदी’

‘वेलकम’ हा अक्षय कुमारचा लोकप्रिय कॉमेडी चित्रपट आहे. आत्तापर्यंत दोन भाग आले आहेत आणि लोक खूप दिवसांपासून तिसऱ्या भागाची वाट पाहत आहे. तिसऱ्या भागाला ‘वेलकम टू द जंगल’ असे नाव देण्यात आले आहे. वेलकम 3’चे दिग्दर्शक अहमद खान यांनीही दलेर मेहंदीला या चित्रपटात कास्ट केले आहे.
अनेक दिवसांपासून लोक या चित्रपटाची वाट पाहत आहे. आता दलेर मेहंदीने एका मुलाखतीत या चित्रपटाविषयी सांगितले आहे. ते म्हणाले, ‘चित्रपटाचे ७० टक्के चित्रीकरण झाले आहे . चित्रपटात त्याचे ‘जुगनी’ गाणे आहे.’
View this post on Instagram
चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांच्या घरी दलेर मेहंदी आपल्या मुलीसोबत गेले त्यावेळी दलेर हे त्यांना आपल्या गाण्याबाबत सांगत होते मात्र अहमद यांचे लक्ष दुसऱ्याच कामात लागले होते.
त्यांनी दलेरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं मग दलेर आपल्या मुलीसोबत तेथून निघून गेले, वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची मुलगी दुखावली होती. मात्र दलेरने आपल्या मुलीची समजूत काढली. काही दिवसांनी अहमद खान यांच्या दलेर मेहंदीला फोन आला ते म्हणाले, ‘वेलकम ३’ मध्ये साठी एक रोल आहे करणार का ? त्यांनी लगेच त्यावर होकार दिला.
‘वेलकम’ या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त परेश रावल, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस आणि रवीना टंडन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याआधी हा चित्रपट यावर्षीच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता, परंतु आता तो 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.




