“फक्त दलाई लामाच त्यांचा उत्तराधिकारी ठरवू शकतात” ; भारताने चीनला दिली योग्य पद्धतीने समज

Dalai Lama Successor । भारताने चीनला,”फक्त तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामाच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत निर्णय घेऊ शकतात ” असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. भारताने आज शेजारील देशाला सांगताना,”त्यांनी दलाई लामा यांच्या पुनर्जन्माला मान्यता द्यावी.’ असे म्हटले आहे. दलाई लामा यांनी नुकतेच त्यांनी स्थापन केलेल्या गादेन फोडरंग ट्रस्टला त्यांचा पुनर्जन्म ओळखण्याचा अधिकार आहे, परंतु दुसरीकडे चीन दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडेल असा आग्रह धरत आहे. मात्र, १४ व्या दलाई लामांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “या प्रकरणात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.”
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी, ‘दलाई लामा यांचे स्थान केवळ तिबेटी लोकांसाठीच नाही तर जगभरातील त्यांच्या सर्व अनुयायांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे दलाई लामांचा आहे. भारताने असेही म्हटले आहे की केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राजीव रंजन सिंह रविवारी १४ व्या दलाई लामा यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या समारंभात सहभागी होतील.
“भविष्यातील दलाई लामा यांना मान्यता देण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर २०११ च्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे,” असे दलाई लामा यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की असे करण्याची जबाबदारी केवळ गादेन फोडरंग ट्रस्टच्या सदस्यांवर असेल.
चीनने काय म्हटले? Dalai Lama Successor ।
मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, “दलाई लामा यांच्या उत्तराधिकारीची निवड चीनच्या सीमेत त्यांच्या देखरेखीखाली झाली पाहिजे. चीनची ही बऱ्याच काळापासूनची भूमिका आहे.”
दलाई लामा १९५९ पासून भारतात Dalai Lama Successor ।
दलाई लामा १९५९ पासून भारतात निर्वासित जीवन जगत आहेत. जेव्हा चिनी राजवटीविरुद्ध बंड झाले तेव्हा ते तेथून भारतात आले. दलाई लामा यांना जगभरात अहिंसा, करुणा आणि तिबेटी लोकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीचे रक्षण करण्यासाठीच्या संघर्षाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते, तर बीजिंग त्यांना फुटीरतावादी म्हणून वर्णन करते. निर्वासित असलेल्या अनेक तिबेटींना भीती आहे की भविष्यात चीन स्वतःचा दलाई लामा नियुक्त करण्याचा प्रयत्न करू शकेल.





