Gautami Patil : बाप रे बाप! इथं लयचं राडा… मुंबईकरांचा नादचं नाय करायचा.! गौतमी पाटीलचा बेभान डान्स
Dahi Handi 2025 । Gautami Patil : महाराष्ट्राची लाडकी सबसे कातील गौतमी पाटील हिने सलग तिसऱ्या वर्षी मुंबईच्या मागाठाणे येथील दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. यावेळी तिने आपल्या नृत्याने सर्वांची मनं जिंकली. तिचा बेभान होऊन डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. तिने आपल्या डान्समधून सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या डान्समधून तिने पुन्हा एकदा सबसे कातील गौतमी पाटील पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.
दहिवही सोहळ्यात आपल्या भावना गौतमीने व्यक्त केल्या. “मुंबईकर…. इथे लईच राडा आहे. मुंबईकरांचा नादच करायचा नाही. मुंबईतील दहीहंडी जोरात असते. तुम्हीच मला संधी दिली. या स्टेजपासून माझ्या मुंबईच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रकाश दादांनी संधी दिली. म्हणून मी तुमचे आभार मानते, असं तिने यावेळी बोलताना म्हणाली. हे माझं तिसरं वर्ष आहे. माझ्यासोबत तुम्ही पण राडा घालायचा आहे.” यानंतर तिने आपल्या डान्सला सुरूवात केली.
तिच्या या उत्साहपूर्ण वाक्यांनी प्रेक्षकांमध्येही जोश संचारला. दरम्यान, सोशळ मीडियावर गौतमी पाटील एका शोचे किती रुपये घेते? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडीच्या एका शो साठी गौतमी सुमारे 1.5 ते 2 लाख रुपये घेते, अशी माहिती बातम्यांमध्ये मिळते. तर तिची टीम महिनाभरात सुमारे 30-35 लाख रुपये कमावते, अशी माहिती मिळत आहे.





