बाबो.! पाण्याच्या टाकीत आढळले तब्बल दोन डझन अजगर; बाहेर काढताना अधिकाऱ्यांना फुटला घाम, धडकी भरवणारा Video व्हायरल

Snake News – उत्तर प्रदेशातील इटावामधील एका गावातील अजगराचा विडिओ व्हायरल होताना दिसत आहे. तिथे एका सरकारी कूपनलिकेच्या पाण्याच्या टाकीत एकाच वेळी तब्बल दोन डझनहून अधिक अजगर बाहेर काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
इतके अजगर एकाच वेळी पाहून गावकरी देखील हैराण झाले. या घटनेनंतर आता गावकरी शेतात जाण्यासही घाबरत आहे. दरम्यान घटनेवेळी वनविभागाच्या पथकाला माहिती देण्यात आली, त्यांनी शिताफिने अजगराची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी सोडले.
पाण्याची टाकी खोल होती, त्यामुळे बचावकार्यात टीमला खूप अडचणी आल्या. इतके अजगर एकाच वेळी पाहून त्यांना बाहेर काढताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही घाम फुटला.
इटावा की पानी की टंकी से निकले 25 अजगर, गांव में दहशत का माहौल pic.twitter.com/wPJOjdMQcr
— Pappu Farishta Journalist by birth (@pappu_farishta) August 30, 2024
हे संपूर्ण प्रकरण इटावा तहसील चाकरनगर भागातील पाली गोपालपूर गावातील आहे. याठिकाणी कूपनलिका पाण्याच्या टाकीत दोन डझन अजगर पाहून ग्रामस्थ हादरले.भीतीमुळे ते आपल्या शेतातही जात नव्हते.
दरम्यान, ग्रामस्थांच्या माहितीवरून वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाण्याच्या टाकीतून २४ अजगर अजगरांची सुटका केली. त्यांच्यामध्ये एक अत्यंत विषारी क्रेट सापही आढळून आला.
चंबळ अभयारण्य परिसरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अजगरांची सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सध्या पकडलेल्या सर्व अजगरांना रेस्क्यू टीमने चंबळ अभयारण्यात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.
बचावकार्य आव्हानात्मक
बचावकार्य करणारे वन्यजीव तज्ज्ञ डॉ.आशिष त्रिपाठी यांनी सांगितले की, पाण्याची टाकी सुमारे १० फूट खोल होती. येथून अजगरांना बाहेर काढणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. मात्र मोठ्या काळजीने एक एक करून सर्व अजगर बाहेर काढण्यात आले आहेत.
पाण्याच्या टाकीतून २४ अजगर आणि एक विषारी क्रेट साप बाहेर काढण्यात आला आहे. अजगर इतके धोकादायक नसतात, परंतु क्रेट साप अतिशय विषारी असतो. त्याच्या दंशाने माणसाचा मृत्यू होऊ शकतो.





