टिफिनमध्ये जेवण की ड्रग? ‘डब्बा कार्टेल’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

Dabba Cartel Trailer Released | नेटफ्लिक्सने ‘डब्बा कार्टेल’ या नव्या शोची घोषणा केली आहे. महिला ड्रग माफियांवर आधारित या शोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या शोचे दिग्दर्शन हितेश भाटिया यांनी केले आहे आणि फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी निर्मिती केली आहे.
‘डब्बा कार्टेल’ची कथा ठाणे, मुंबई येथे राहणाऱ्या ५ महिलांभोवती फिरते, या सामान्य महिलांप्रमाणे टिफिन सेवा चालवतात. मात्र जेव्हा या महिला टिफिन सेवेच्या नावाखाली ड्रग माफिया चालवत असल्याचे समोर येते तेव्हा ट्वीस्ट पाहायला मिळतो. शोच्या ट्रेलरमध्ये आपल्याला याची झलक दिसते. हा ट्रेलर पाहिल्यानंतर या शोची उत्सुकता आणखी वाढली आहे.
View this post on Instagram
नेटफ्लिक्सचा हा आगामी शो २८ फेब्रुवारीपासून ओटीटीवर प्रसारित होणार आहे. यामध्ये शबाना आझमी, गजराज राव, ज्योतिका, निमिषा सजयन, शालिनी पांडे, अंजली आनंद, सई ताम्हणकर, जिशु सेनगुप्ता, लिलेट दुबे आणि भूपेंद्र सिंग जादावत यांसारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. Dabba Cartel Trailer Released |
गेल्या वर्षी संजय लीला भन्साळीचा ‘हिरामंडी’ वेबसिरिज नेटफ्लिक्सवरही आली, ज्यात महिला मुख्य भूमिकेत होत्या. या शोला चांगला प्रतिसाद मिळाला. आता स्त्रियांवर आधारित डब्बा कार्टेल’ या शोचा प्रेक्षकांवर किती परिणाम करणार? हे पहावे लागणार आहे. Dabba Cartel Trailer Released |
हेही वाचा:





