मुंबईः न्यू डंडिया को अॅापरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. आर्थिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि विकासक धर्मेश पौनला अटक केली. त्यांच्यावर बँकेतील संबंधित रकमेचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कोर्टाने दोघांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात असून दोघांचीही पोलिस कसून चौकशी करत आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात हितेश मेहता हा सहकार्य करत नसल्याने कोर्टाकडे त्याची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस करणार आहेत.
या प्रकरणानंतर रिझर्व बँक अॅाफ इंडियाने न्यू इंडिया को अॅापरेटिव्ह बँकवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार बँकेला कर्ज वाटपास, नवीन ठेवी स्वीकारण्यास आणि पैसे देण्यास बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकेत अनेक ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहेत. आरोपींच्या प्राथमिक तपासात बँकेत १३० कोटींहून अधिकच्या रोकडची कॅश इन हँडमध्ये नोंद होती. त्यापैकी १२२ कोटी रुपयांचा अपहार संशयित आरोपी मेहताने साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती आहे.
लेखापरीक्षणातून प्रकरण आले उघडकीस
मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व बँक अॅाप इंडियाच्या एका पथकाने को अॅापरेटिव्ही बँकेचे लेखापरीक्षण केले. हे लेखापरीक्षण १२ फेब्रुवारी २०२५ रोजी झाले. पथकातील अधिकाऱ्यांना या लेखापरीक्षणात शेकडो कोटी रुपयांची तफावत आढळून आली. बँकेच्या मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेल्या शाखेतून तब्बल १२२ कोटी रुपये गायब झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आली. यामध्ये पोलिसांना बँकेचे माजी व्यवस्थापक हितेश मेहता यांना अटक केली आहे. त्यांच्यावर अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ते २०१९ ते २०२५ या सहा वर्षांत बँकेचे आर्थिक व्यवहार सांभाळत होते.
आतापर्यंतच्या तपासात काय काय झालं?
हितेश मेहताने विकासक धर्मेश पौनला 70 कोटी दिले. सोलर पॅनल व्यावसायिक उन्ननाथन अरुणाचलमला यांना 40 कोटी दिले. नंतर मेहताने माहितीत फेरफार करत पौनला 50 कोटी दिल्याचे सांगितले. धर्मेशच्या म्हणण्यानुसार, मेहताने 12 ते 13 कोटी दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मधल्या पैशांचे नेमके काय झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घोटाळा प्रकरणातील मेहता काहीतरी माहिती लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. यासाठीच पोलिसांना कोर्टाकडे लाय डिटेक्टर चाचणीची मागणी करणार आहे.
लाय डिटेक्टर चाचणी कशी केली जाते?
एखादी व्यक्ती खोटी बोलतेय का याची तपासणी करण्यासाठी ही चाचणी केली जाते. या चाचणी दरम्यान प्रश्नांची उत्तरं देताना शरीरातील बदल मोजले जातात. ज्या व्यक्तीची टेस्ट घेतली जात आहे, तो प्रश्नांची उत्तरे देत असल्याच्या प्रतिक्रयेवरून संबंधित व्यक्ती दोषी आहे की निर्दोष हे ठरवले जाते.