satara | डी. के. पवार यांच्या वाढदिनी नेत्र तपासणी शिबीराला प्रतिसाद

फलटण, (प्रतिनिधी) – पिंपळवाडी साखरवाडी, ता. फलटण येथील राजकीय क्षेत्रातील एक आघाडीचे लोकप्रतिनिधी महानंद डेअरीचे व्हा. चेअरमन डी. के. पवार (अण्णा ) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नेत्र चिकित्सा शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 225 नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच 50 रुग्णांना ऑपरेशनसाठी मंहमदवाडी हडपसर येथे पाठवण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या शिबिरासाठी डॉ.नितीन शिंदे, सौ.संध्या शिंदे, सौ. मोनिका पवार आणि साखरवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अनिकेत उघडे आणि त्यांचा पूर्ण स्टाफ यांचे सहकार्य लाभले.
यावेळी फलटण पंचायत समितीचे सभापती शंकरराव माडकर, नितीश भोसले, धनंजय पवार, दत्तात्रेय रणवरे, सतीश माने,अशोक सोनवणे, तानाजी बिबे, हनुमंत नेवसे, नीलेश कापसे, शरदराव रणवरे, चंद्रकांत रणवरे, शिवाजी ना भोसले, डॉ. तेजसिंह खानविलकर, रमेश भोसले, राजेंद्र गायकवाड, वसंतराव अडसुळ, जयराम भोसले, विक्रम भोसले, माणिक भोसले, भिमदेव बुरुंगले, भाऊसाहेब कापसे, हिंदुराव वारे, दिलीप पवार, किरण जराड, संतोष शेंडगे,
संभाजी जगदाळे, दादा चव्हाण, तेजसभैय्या भिसे, नामदेव भोसले, मस्कू पिसाळ, रवींद्र जगताप, सूत्रसंचालका टिळेकर व रवि पवार, श्रीकांत भोसले, संजय भोसले, नितीन धुमाळ , बापूराव जगताप, पै.दौलत भोसले, समीर भोसले, रमेश अण्णा भोसले, महेश भोसले, सुरेश भोसले, अनिकेत जाधव, सुभाष भोसले, हनुमंत कदम,
सचिन फडतरेर, पै. चिमणराव भोसले , विलास मोहिते, विकास तांबे, दशरथ रावळ, ह.भ.प. प्रकाश पवार, सुदेश फडतरे , मधुकर ढेंबरे , गणेश भोसले, संतोष कांताराम भोसले, नाना कोळपे, हरिदास कोळपे, पत्रकार विनायक शिंदे, आढाव, किसन भोसले, पै. संतोष साळुंखे, दत्तोबा रुपनगर, शरद जाधव, मारुती नाना आदि मान्यवर उपस्थित होते.





