गॅस एजन्सीमधून घरी आणलेल्या सिलेंडरचा भीषण स्फोट; पती – पत्नीचा जागीच मृत्यू

कानपुर : सध्या दिवाळीचा सण असल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण देशात हा सण साजरा केला जात आहे. यादरम्यान एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये सिलेंडर गॅसचा स्फोट झाल्याने एका दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला आहे. या स्फोटात नवरा-बायको दोघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे.
काय घडले नेमके?
घराचा मालक सुरेंद्र यांच्या बायकोने त्यांना घरातील गॅस सिलिंडर संपल्याने सिलिंडर आणण्यासाठी पाठवलं. यानंतर ते आपल्या लुना मोपेड या गाडीने गॅस सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीमध्ये गेले. त्यांनी त्यावर सिलिंडर ठेवला होता. घरी पोहोचताच सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर लुना बाइक पूर्णपणे जळून खाक झाली. तसेच सुरेंद्र आणि त्यांच्या बायकोचा यामध्ये मृत्यू झाला.
गॅस सिलिंडरचा स्फोट इतका भयंकर होता की शेजाऱ्यांच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की पतीच्या शरीराचे तुकडे झाले. जवळपास 8 घरांच्या भिंतींना भेगा पडल्या. आजूबाजूला असलेल्या गाड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने त्यांचं मोठं नुकसान झालं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.





