Cyclone Akwan : ओडिशाच्या किनारपट्टीवर अकवान चक्रीवादळ धडकले
Cyclone Akwan : दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आज सकाळी 'अकवान' चक्रीवादळ धडकले.

Cyclone Akwan : दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर आज सकाळी 7:30 ते 8:30 दरम्यान अकवान चक्रीवादळ धडकले आहे. किनारपट्टी ओलांडताना वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटर असून, वाऱ्याचे झोत ताशी 90 किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. (Cyclone Akwan)
त्यामुळे मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, या हवामान प्रणालीमुळे राज्यात आतापर्यंत कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकवान चक्रीवादळ धडकण्याची प्रक्रिया सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सुरू झाली आणि सकाळी ११.२० पर्यंत पूर्ण झाली. (Cyclone Akwan)
या चक्रीवादळाने सकाळी ७.३० ते ८.३० च्या दरम्यान ताशी ७०-८० किमी वेगाने आणि वाऱ्याच्या झोतांनी ताशी ९० किमी वेगापर्यंत पोहोचत दक्षिण किनारपट्टी ओडिशा आणि गोपाळपूरजवळून उत्तर आंध्र प्रदेश ओलांडला. (Cyclone Akwan)
या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडला. गंजम जिल्ह्यातील पात्रपूर येथे सर्वाधिक २०९ मिमी पावसाची नोंद झाली. त्या पाठोपाठ हिंजिली (२०७), चिकिटी (१९९), गोपालपूर (१९०) आणि छत्रपूर (१३९) येथे पावसाची नोंद झाली. (Cyclone Akwan)
Cyclone Akvan : बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळ; अतिवृष्टीचा इशारा




