प्रभात वृत्तसेवा वाघोली – शेअर मार्केट ट्रेडिंग गुंतवणूक करून नफ्याचे आमिष दाखवून वाघोलीतील एका 30 वर्षीय गृहिणी महिलेची 3 लाख 50 हजारांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला अनोळखी फेसबुकवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर फायद्याची जाहिरात दिसली असता त्यावर क्लिक केले असता व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये परस्पर अॅड करून बनावट फायद्याचे स्क्रीनशॉट अनेकांनी टाकून फायदा झाल्याचे भासविण्यात आले. महिलेला बनावट अॅप डाऊनलोड करण्यास सांगून ट्रेडिंग करण्यास सांगितले. महिलेने विश्वास ठेवून वेळोवेळी 3 लाख 50 हजार रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केले. अॅपवर सुमारे 4 लाख 39 हजारांचा फायदा झाल्याचे दिसत असल्याने पैसे काढण्यासाठी पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला असता आणखी टॅक्सचे दीड लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.