#CWC23 #SAvBAN : डी कॉकचे विश्वचषकातील तिसरे शतक, 42 षटकात आफ्रिकेची धावसंख्या 250 पार…

ICC ODI World Cup 2023 South Africa vs Bangladesh Live Score : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 23व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना बांगलादेशशी होत आहे. आफ्रिकेचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावर आहे. बांगलादेश संघ हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान सुधारू इच्छितो, तर दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करू इच्छितो. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
SA vs BAN Live Score : शेवटचे वृत्त हाती आलं तेव्हा 42 षटकात दक्षिण आफ्रिकेनं तीन गड्यांच्या मोबदल्यात 261 धावांपर्यत मजल मारली आहे. सध्या डी कॉक 137*(125) तर क्लासेन 43*(32) धावा करून क्रीजवर आहे.
क्विंटन डी कॉकचे शतक…
बांगलादेशविरूध्दच्या आजच्या सामन्यात क्विंटन डी कॉकने या विश्वचषक 2023 स्पर्धेतील तिसरे आणि एकदिवसीय कारकिर्दीतील 20 वे शतक झळकावले. त्याने 101 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आतापर्यंत त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले आहेत. डी कॉकने याआधी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी खेळली होती. त्याने श्रीलंकेविरुद्ध 100 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 109 धावा केल्या होत्या.
Unstoppable Quinton de Kock hits his third #CWC23 ton to power South Africa in Mumbai 👊@mastercardindia Milestones 🏏#SAvBAN pic.twitter.com/XFs51XiVBp
— ICC (@ICC) October 24, 2023
SA vs BAN Live: तिसरा धक्का, कर्णधार मार्कराम बाद…
दक्षिण आफ्रिकेला 31व्या षटकात 167 धावांवर तिसरा धक्का बसला. शकीब अल हसनने एडन मार्करामला लिटन दासकरवी झेलबाद केले. एडन मार्कराम याला 69 चेंडूत 60 धावा करता आल्या. त्याने डी कॉकसोबत तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली.
SA vs BAN Live: दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का
दक्षिण आफ्रिकेला आठव्या षटकात 36 धावांवर दुसरा धक्का बसला. मेहदी हसन मिराझने रॅसी व्हॅन डर डुसेनला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला एक केवळ धाव करता आली.
SA vs BAN Live : दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का
दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का सातव्या षटकात 33 धावांवर बसला. शरीफुल इस्लामने रीझा हेंड्रिक्सला क्लीन बोल्ड केले. त्याला 19 चेंडूत 12 धावा करता आल्या.
SA vs BAN : दक्षिण आफ्रिकेनं टाॅस जिंकला…
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजही टेंबा बावुमा खेळत नाही. त्याच्या जागी एडन मार्कराम कर्णधार आहे. आफ्रिकन संघात एक बदल झाला आहे. दुखापतीमुळे लुंगी एनगीटी खेळत नाहीये. त्याच्या जागी लिझार्ड विल्यमसनचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी नियमित कर्णधार शकीब अल हसनचे बांगलादेश संघात पुनरागमन झाले आहे. तौहीद हृदय हा सामना खेळत नाही.
SA vs BAN : दोन्ही संघाचं Playing 11 खालीलप्रमाणे…
बांगलादेश : तनजीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मेहदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझार्ड विल्यम्स.





