#CWC23 #SAvAFG | क्विंटन डी कॉकने अफगाणिस्तानविरुद्ध विकेटच्या मागे रचला इतिहास; दक्षिण आफ्रिकेसाठी केला नवा विक्रम…

World Cup 2023 South Africa vs Afghanistan Match Quinton de Kock Record : विश्वचषक सामन्यात क्विंटन डी कॉकने एक नवीन इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या यष्टीरक्षकाने विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात स्पर्धेतील एका सामन्यात एकूण 6 झेल घेत इतिहास रचला. डी कॉक हा दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषक सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक ठरला. त्याने आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक मार्क बाउचरला याबाबतीत मागे टाकले.
डी कॉकच्या आधी, मार्क बाउचर आणि मॉर्न व्हॅन विक यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी वर्ल्ड कप सामन्यात यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक 4 झेल घेतले होते. पण आता हा विक्रम डी कॉकच्या नावावर झाला आहे. डी कॉकने अफगाणिस्तानविरुद्ध इब्राहिम झद्रान, कर्णधार शाहिदी, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, रशीद खान आणि नूर अहमद यांचे झेल घेतले.
यासह डी कॉकने विश्वचषकातील एका सामन्यात यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक फलंदाज बाद करण्याच्या बाबतीत माजी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट आणि पाकिस्तानी यष्टीरक्षक सर्फराज अहमद यांची बरोबरी केली.
विश्वचषकाच्या सामन्यात यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी
6- अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध नामिबिया, पॉचेफस्ट्रूम, 2003
6- सर्फराज अहमद (पाकिस्तान) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ऑकलंड, 2015
6- क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध अफगाणिस्तान, अहमदाबाद, 2023*
विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी…
21 – अॅडम गिलख्रिस्ट (वर्ल्ड कप 2003)
21 – टॉम लॅथम (वर्ल्ड कप 2019)
20 – अॅलेक्स केरी (वर्ल्ड कप 2019)
19 – क्विंटन डी कॉक (वर्ल्ड कप 2023)*
17 – कुमार संगकारा (वर्ल्ड कप 2003)
17 – अॅडम गिलख्रिस्ट (वर्ल्ड कप 2007)
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सर्वबाद 244 धावा केल्या. अजमतुल्ला उर्झाईने संघासाठी 97* धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.





