#CWC23 NZvAFG : अफगाणिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय; न्यूझीलंड संघात 1 मोठा बदल, जाणून घ्या…दोन्ही संघाचे Playing 11

World Cup 2023 New Zealand vs Afghanistan Playing 11 : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून अफगाणिस्तानने विश्वचषक स्पर्धेतील सर्व संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली असून आज( बुधवार,18 आॅक्टोबर) चेन्नई येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या 16 व्या सामन्यात न्यूझीलंड अफगाणिस्तान संघाला नक्कीच हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. न्यूझीलंड संघाला स्पर्धेतील आपले अपराजित अभियान सुरू ठेवायचे आहे. त्याचवेळी अफगाणिस्तान आणखी उलटफेर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. हा सामना दुपारी 2वाजता सुरू होईल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा (Toss) कौल हा अफगाणिस्तान संघाच्या बाजूनं लागला आहे.अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.(Afghanistan win the toss in Chennai, and opt to bowl against New Zealand) न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.
अफगाणिस्तानने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. नियमित कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे न्यूझीलंड संघात नाही. त्याच्या जागी टॉम लॅथम कर्णधार आहे. विल्यमसनच्या जागी सलामीवीर विल यंगचे पुनरागमन झाले आहे. त्याने नेदरलँडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.
दोन्ही संघांचे Playing-11 खालीलप्रमाणे …
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, फजलहक फारुकी.
दरम्यान, दिल्लीत झालेल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा 69 धावांनी पराभव करणाऱ्या अफगाणिस्तानचे आणखी एक उलटफेर करण्याचे लक्ष्य असेल. न्यूझीलंडने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले असून धावगतीच्या आधारावर भारताच्या मागे त्याचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पहिल्या दोन सामन्यात बांगलादेश आणि भारताकडून अफगाणिस्तानचा पराभव झाला होता, मात्र तिसऱ्या सामन्यात हशमतुल्ला शाहिदीच्या संघाने इंग्लंडसारख्या दिग्गज संघाला पराभूत करून नवा इतिहास रचला.





