\n

पाकिस्तानकडून मिळालेल्या 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. डेंग्यूमधून बरा झालेला शुभमन गिल 11 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. शाहीन आफ्रिदीने त्याला शादाब खानकरवी झेलबाद केले. शुभमन फॉर्ममध्ये दिसत आहे आणि आगामी सामन्यांसाठी टीम इंडियाच्या दृष्टिकोनातून ही चांगली बातमी आहे. तो बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रीजवर आला. कोहलीने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी 56धावांची भागीदारी केली.

\n

कोहली लवकर बाद…

\n

पाकिस्तानविरुद्ध सहसा मोठी खेळी खेळणारा विराट या सामन्यात विशेष काही करू शकला नाही. कोहलीने 18 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या. हसन अलीच्या चेंडूवर मोहम्मद नवाजकरवी तो झेलबाद झाला. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर क्रीझवर आला. श्रेयसने कर्णधार रोहित शर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली.

\n

रोहितचा षटकारांचा पाऊस..

\n

रोहित शर्माला सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावता आले नाही. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 131 धावांची खेळी केली होती. या सामन्यातही त्याला शतक झळकावण्याची संधी होती, मात्र त्याला तसे करता आले नाही. रोहित 63 चेंडूत 86 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.  शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर इफ्तिखार अहमदने रोहितचा झेल घेतला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 136.51 होता. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकारही पूर्ण केले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला.

\n
\n

8⃣6⃣ Runs
\n6⃣3⃣ Balls
\n6⃣ Fours
\n6⃣ Sixes

\n

That was a 🔝 knock from #TeamIndia captain Rohit Sharma! 👏 👏

\n

Follow the match ▶️ https://t.co/H8cOEm3quc#CWC23 | #INDvPAK | #MeninBlue pic.twitter.com/W3SHVn1wzD

\n

— BCCI (@BCCI) October 14, 2023

\n

\n

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर केएल राहुलसह श्रेयस अय्यरने सामना संपवला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 36 धावांची नाबाद भागीदारी केली. अय्यरने चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले आणि सामना संपवला. 62 चेंडूत 53 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. अय्यरने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. केएल राहुलनं 29 चेंडूत नाबाद 19 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून दोन चौकार आले.

\n

रोहित शर्माने विशेष केली कामगिरी… 

\n

रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार पूर्ण केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार मारणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावावर 351 षटकार आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर 331 षटकार आहेत.

\n

 

\n

तत्पूर्वी, पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो 49 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने 36, अब्दुल्ला शफीकने 20 आणि हसन अलीने 12 धावा केल्या. याशिवाय सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सौद शकील सहा, मोहम्मद नवाज चार, इफ्तिखार अहमद चार, शदाख खान दोन आणि हारिस रौफ दोन धावा करून बाद झाला.

\n
\n

Innings Break!

\n

A cracker of a bowling performance from #TeamIndia! 👌 👌

\n

Jasprit Bumrah, Kuldeep Yadav, Ravindra Jadeja, Hardik Pandya & Mohd. Siraj share the spoils with 2️⃣ wickets each!

\n

Scorecard ▶️ https://t.co/H8cOEm3quc#CWC23 | #INDvPAK | #MeninBlue pic.twitter.com/omDQZnAbg7

\n

— BCCI (@BCCI) October 14, 2023

\n

\n

टीम इंडियाच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर हा एकमेव असा होता ज्याला एकही यश मिळाले नाही. वेगवान गोलंदाज बुमराहनं 7 षटकात 19 धावा तर सिराजनं 8 षटकांत 50 धावा दिल्या. शार्दुलनं अवघे दोन षटक टाकले अन् 12 धावा दिल्या.  अष्टपैलू हार्दिकनं 6 षटकात 34 धावा दिल्या. फिरकीपटू कुलदीप यादवनं 10 षटक पूर्ण करताना 35 तर जडेजानं 9.5 षटकात 38 धावा दिल्या. बुमराहला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#CWC23 #INDvPAK : विश्वचषकात Team India ची आठव्यांदा पाकिस्तानवर मात,गुणतालिकेमध्येही अव्वलस्थानी…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/won.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-indvpak-india-stay-unbeaten-against-pakistan-in-odi-world-cups#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/won.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-indvpak-india-stay-unbeaten-against-pakistan-in-odi-world-cups#webpage","name":"#CWC23 #INDvPAK : विश्वचषकात Team India ची आठव्यांदा पाकिस्तानवर मात,गुणतालिकेमध्येही अव्वलस्थानी…","url":"https://www.dainikprabhat.com/cwc23-indvpak-india-stay-unbeaten-against-pakistan-in-odi-world-cups","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-indvpak-india-stay-unbeaten-against-pakistan-in-odi-world-cups#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/won.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-indvpak-india-stay-unbeaten-against-pakistan-in-odi-world-cups#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-indvpak-india-stay-unbeaten-against-pakistan-in-odi-world-cups","name":"#CWC23 #INDvPAK : विश्वचषकात Team India ची आठव्यांदा पाकिस्तानवर मात,गुणतालिकेमध्येही अव्वलस्थानी…"}}]}}}

#CWC23 #INDvPAK : विश्वचषकात Team India ची आठव्यांदा पाकिस्तानवर मात,गुणतालिकेमध्येही अव्वलस्थानी…