\n

Ind vs Aus Live Score : 14 षटकांनंतर भारताची धावसंख्या 3 बाद 94…

\n

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, भारतीय संघाने 14 षटकात तीन विकेट गमावत 94 धावा केल्या आहेत. विराट कोहली 30 आणि केएल राहुल सात धावांवर नाबाद आहे. भारतीय चाहत्यांना दोन्ही खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

\n

श्रेयस अय्यरही परतला पॅव्हेलियनमध्ये

\n

श्रेयस अय्यरच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. अय्यरला कमिन्सने यष्टिरक्षक जोश इंग्लिशच्या हाती झेलबाद केले. त्याला तीन चेंडूत केवळ चार धावा करता आल्या.

\n

मॅक्सवेलनं केलं रोहित शर्माला बाद…

\n

रोहित शर्माच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. 10व्या षटकातील चौथ्या षटकात तो बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर तो ट्रॅव्हिस हेडकरवी झेलबाद झाला. रोहित 31 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावा करून बाद झाला.

\n

शुभमन गिल अंतिम फेरीत ठरला अपयशी… 

\n

शुभमन गिल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अपयशी ठरला आहे. तो पाचव्या षटकात मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. लाँग ऑनवर उभ्या असलेल्या अॅडम झाम्पाने त्याचा झेल घेतला. गिलला सात चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. भारताला पहिला धक्का 30 धावांवर बसला.

\n

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय….

\n

तत्पूर्वी,झालेला नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलिया संघाच्या बाजूनं लागला आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक (TOSS )जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, त्याने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. रोहितने सांगितले की, मी Toss जिंकला असता तर प्रथम फलंदाजीचाा निर्णय घेतला असता. दुसरीकङे ऑस्ट्रेलियन संघातही कोणताही बदल झालेला नाही.

\n

दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे 👇👇👇

\n

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

\n

ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

\n

दरम्यान, भारतीय संघाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने तीन वेळा एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळली. यामध्ये भारताला 2 वेळा  विजय आणि एकदा पराभव स्विकारावा लागला.1983 मध्ये, भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता, जिथे त्याने वेस्ट इंडिजचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले होते.

\n

यानंतर 2003 मध्ये भारत दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. त्यानंतर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारताला ऑस्ट्रेलियाकडून 125 धावांनी पराभव पत्करावा लागला.त्यानंतर 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेला हरवून भारताने 28 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर आज भारत विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#CWC2023 #INDvAUS Final : भारताला तिसरा धक्का; कर्णधार शर्मापाठोपाठ अय्यरही परतला पॅव्हेलियनमध्ये…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/ddd.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-indvaus-final-shreyas-iyer-falls-for-four-wickets-in-consecutive-overs-for-australia-india-are-three-down#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/ddd.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-indvaus-final-shreyas-iyer-falls-for-four-wickets-in-consecutive-overs-for-australia-india-are-three-down#webpage","name":"#CWC2023 #INDvAUS Final : भारताला तिसरा धक्का; कर्णधार शर्मापाठोपाठ अय्यरही परतला पॅव्हेलियनमध्ये…","url":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-indvaus-final-shreyas-iyer-falls-for-four-wickets-in-consecutive-overs-for-australia-india-are-three-down","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-indvaus-final-shreyas-iyer-falls-for-four-wickets-in-consecutive-overs-for-australia-india-are-three-down#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/ddd.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-indvaus-final-shreyas-iyer-falls-for-four-wickets-in-consecutive-overs-for-australia-india-are-three-down#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-indvaus-final-shreyas-iyer-falls-for-four-wickets-in-consecutive-overs-for-australia-india-are-three-down","name":"#CWC2023 #INDvAUS Final : भारताला तिसरा धक्का; कर्णधार शर्मापाठोपाठ अय्यरही परतला पॅव्हेलियनमध्ये…"}}]}}}

#CWC2023 #INDvAUS Final : भारताला तिसरा धक्का; कर्णधार शर्मापाठोपाठ अय्यरही परतला पॅव्हेलियनमध्ये…