Ajay Devgn and Tabu: ‘क्यूट जोडी’! अजय देवगण आणि तब्बूचा खास अंदाज; व्हिडिओला चाहत्यांची पसंती
Ajay Devgn and Tabu: अजय आणि तब्बूची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच आवडते

Ajay Devgn and Tabu: अभिनेता अजय देवगणची मुख्यभूमिका असलेला ‘दृश्यम ३’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या ट्रेलर लाँच इव्हेंटमधील तब्बू आणि अजय देवगणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Ajay Devgn and Tabu)
या व्हिडीओमध्ये अजय देवगण आणि तबू पापाराझींना कॅमेऱ्यासमोर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दिसतंय की अजय देवगण फोटोसाठी उभा असताना पाठीमागून तबू येते आणि त्याच्या हात हातात घालून पापाराझींना फोटोसाठी पोझ देते. या व्हिडीओतून पडद्यामागचीही त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
यावर चाहत्यांनी “ही मैत्री नाही तर प्रेम आहे”, “जेव्हा तब्बू त्याच्या आजूबाजूला असते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर वेगळचं तेज असतं”, “क्यूट जोडी”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. (Ajay Devgn and Tabu)
View this post on Instagram
या सोहळ्यात अजय देवगण डेनिम जीन्स आणि व्हाईट शर्टमध्ये बिंधास्त दिसला, तर तब्बूने ब्लॅक ड्रेसमध्ये उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अजय आणि तब्बूने या खास प्रसंगासाठी ‘ब्लॅक अँड व्हाईट’ ड्रेस निवडला होता. दरम्यान, अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच आवडली आहे. (Ajay Devgn and Tabu)
दरम्यान, ‘दृश्यम’ फ्रँचायझीच्या आधीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अजय देवगणच्या ‘विजय साळगावकर’ या पात्राने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. ( Ajay Devgn and Tabu)
‘दृश्यम ३’ हा ‘दृश्यम’च्या फ्रँचायजीमधला शेवटचा भाग असल्याने तिसऱ्या भागाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात प्रकाश राज, जयदीप अहलावत, श्रीया सरन, कमलेश सावंत, इशिता दत्ता या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा:





