नागपूरमध्ये ११ ठिकाणी संचारबंदी अनिश्चित काळासाठी लागू राहणार; सध्याची परिस्थिती कशी?

Nagpur News | छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर हटवा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदसह बजरंग दलाकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. सोमवारी सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत झालेल्या भीषण राड्यात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यात अनेक पोलिस जखमी झाले. सोमवारी घडलेल्या घटनेनंतर सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.
11 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी
नागपूरमध्ये सध्या शांतता असली तरीही शहरातील काही भागात लागू करण्यात आलेली संचारबंदी अनिश्चित काळासाठी असणार आहे. नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नसणार आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यात संचारबंदीचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Nagpur News |
दरम्यान, आज (19 मार्च) दंगल सदृश प्रभावित क्षेत्र वगळता आज नागपूरमध्ये जनजीवन सामान्य पद्धतीने सुरु आहे. नागपूर मेट्रो, शहर परिवहन सेवा, राज्य परिवहन सेवा देखील नियमित पद्धतीने सुरु आहेत. मात्र 11 पोलीस ठाणे हद्दीतील प्रभावित क्षेत्रात फक्त संचार बंदी लागू असणार आहे.
तसेच संचारबंदी क्षेत्रात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. कोतवाली, गणेशपेठ, तहसील, शांतीनगर, सक्करदरा, लकडगंज, पाचपावली, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर व कपिलनगर याठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे. Nagpur News |
औरंगजेबाच्या कबरीला कडेकोट बंदोबस्त
नागपूर येथील हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादे येथील औरंगजेबाच्या कबरीला कडेकोट बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. या कबरीकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग केली आहे. सध्या कबर परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. Nagpur News |
हेही वाचा :
“जे वचन दिले होते ते पूर्ण केले” ; सुनीता विल्यम्सच्या परतीवर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया





