CSK vs RCB : आरसीबीचा चेपॉकवर ऐतिहासिक विजय! १७ वर्षांनंतर सीएसकेला चारली पराभवाची धूळ

CSK vs RCB Royal Challengers Bangalore beat Chennai Super Kings after 17 years at Chepauk : कर्णधार रजत पाटीदारच्या अर्धशतकानंतर केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने सीएसकेचा ५० धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. आरसीबीने २००८ नंतर चेपॉक स्टेडियमवर हा पहिलाच विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत सात गडी गमावून १९६ धावा केल्या, परंतु चेन्नई संघ निर्धारित षटकांत आठ गडी गमावून केवळ १४६ धावाच करू शकला. सीएसकेकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू रचिन रवींद्र होता, ज्याने ३१ चेंडूत ४१ धावा केल्या. यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने १६ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३० धावा काढत नाबाद राहिला.
आरसीबीने सीएसकेच्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी नोंदवल पहिला विजय –
लक्ष्याचा पाठलाग करताना, सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि जोश हेझलवूडने त्यांना दोन धक्के दिले. यानंतर सीएसकेला दीपक हुड्डाच्या रूपाने तिसरा धक्का बसला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शिवम दुबेने रचिनसोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न केला, पण यश दयालने या दोन्ही फलंदाजांना आपले बळी बनवले. शिवम १९ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. शेवटच्या षटकात, धोनीने कृणाल पंड्याला सलग दोन षटकार आणि एक चौकार लगावला, परंतु आरसीबी संघ चेपॉकवरील विजयाचा दुष्काळ संपवण्यात यशस्वी झाला.
https://twitter.com/IPL/status/1905681662442438699
जडेजाच्या आयपीएलमध्ये ३००० धावा आणि १०० विकेट्स पूर्ण –
New milestone unlocked 🔓
3️⃣0️⃣0️⃣0️⃣ runs in the #TATAIPL and plenty more to come 🔥
Congratulations @imjadeja 👏
Updates ▶ https://t.co/I7maHMwxDS #CSKvRCB | @ChennaiIPL pic.twitter.com/amsGeUs9xH
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2025
रवींद्र जडेजाने चांगली फलंदाजी केली आणि आयपीएलमध्ये ३००० धावा आणि १०० विकेट्स पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरला. सामन्यात जडेजाने २५ धावा केल्या, तर अश्विन ११ धावा करून बाद झाला. आरसीबीकडून हेझलवूडने तीन, यश आणि लियाम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी दोन आणि भुवनेश्वर कुमारने एक विकेट्स घेतली. २०२५ च्या हंगामात आरसीबीने चांगली सुरुवात केली आहे. प्रथम, त्यांनी गतविजेत्या केकेआरला पराभूत केले आणि आता त्यांनी सीएसकेला पराभूत करून सलग दुसरा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
हेही वाचा – IPL 2025 चे वेळापत्रक बदलले! KKR vs LSG सामना आता ‘या’ तारखेला होणार, जाणून घ्या कारण
आरसीबीने सीएसकेसमोर ठेवले होते १९७ धावांचे लक्ष्य –
तत्पूर्वी चेन्नईने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. होते पाटीदारने ३२ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या, ज्यामुळे आरसीबीला २० षटकांत सात बाद १९६ धावा करता आल्या. आरसीबीला १९० धावांचा टप्पा ओलांडून देण्याचे श्रेय रजत पाटीदार व्यतिरिक्त टिम डेव्हिडला जाते. त्याने शेवटच्या षटकात सॅम करन टाकण्यासाठी आलेल्या षटकात डेव्हिडने सलग तीन षटकार मारले आणि त्या षटकातून एकूण १९ धावा काढल्या. डेव्हिडने २२ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांसह २२ धावा काढत नाबाद राहिला.
हेही वाचा – CSK vs RCB : हेल्मेटवर चेंडू मारल्याचा विराटने घेतला बदला, VIDEO होतोय व्हायरल
सॉल्ट आणि कोहलीच्या मदतीने आरसीबीने चांगली सुरुवात केली होती, परंतु सीएसकेने पुनरागमन केले. आरसीबीकडून सॉल्टने ३२ धावा, कोहलीने ३१ धावा, देवदत्त पडिक्कलने २७, जितेश शर्माने १२ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने १० धावा केल्या. सीएसकेकडून फिरकी गोलंदाज नूर अहमदने सर्वाधिक तीन, मथिशा पाथिरानाने दोन आणि खलील अहमद आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





