CSK vs KKR : सुनील नरेनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर KKR चा मोठा विजय, CSK चा सलग पाचवा पराभव

CSK vs KKR Kolkata Knight Riders beat Chennai Super Kings by 8 wickets : ६८३ दिवसांनंतर महेंद्रसिंग धोनीचे कर्णधारपदी पुनरागमन देखील चेन्नई सुपर किंग्जचे नशीब बदलू शकले नाही. या हंगामात आधीच सलग चार सामने गमावलेल्या चेन्नईला आता पाचव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सकडून ८ विकेट्सनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात, धोनीसह चेन्नईच्या संपूर्ण फलंदाजीने या हंगामातील सर्वात वाईट कामगिरी केली आणि त्यांना फक्त १०३ धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल, सुनीस नरेनने गोलंदाजीनंतर फलंदाजीतही शानदार कामगिरी केली आणि १८ चेंडूत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या, ज्याच्या मदतीने केकेआरने १०.१ षटकात दोन गडी गमावून १०७ धावा करून विजय मिळवला आणि त्यांचा तिसरा विजय नोंदवला. सीएसकेकडून अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
𝐂𝐨𝐦𝐦𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 𝐰𝐢𝐧 𝐚𝐭 𝐂𝐡𝐞𝐩𝐚𝐮𝐤 💪 pic.twitter.com/XJqCZy3F8J
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 11, 2025
सीएसकेच्या चाहत्यांची पुन्हा निराशा –
चेन्नईच्या चाहत्यांना आशा होती की शुक्रवार, ११ एप्रिलपासून त्यांच्या संघाचे नशीब बदलेल आणि ते विजयाच्या मार्गावर परततील. याचे कारण म्हणजे धोनीच्या हाती पुन्हा कमान आली, ज्याने गेल्या १७ वर्षांत संघासाठी अशी जादू अनेकदा दाखवली होती. पण असे दिसते की ४३ वर्षांच्या वयातही धोनीकडे संघाची परिस्थिती बदलण्याची जादू शिल्लक राहिलेली नाही. या हंगामाच्या सुरुवातीपासूनच चेन्नईची फलंदाजी सतत संघर्ष करत असल्याचे दिसून आले, ज्यामध्ये धावांचा पाठलाग करताना संघाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.
हेही वाचा – CSK vs KKR : रवींद्र जडेजाची गळाभेट घेणाऱ्या खेळाडूला धोनी म्हणाला गद्दार, VIDEO होतोय व्हायरल
केकेआरच्या फिरकी त्रिकुटाने ९ पैकी घेतल्या ६ विकेट्स –
KKR captains to beat CSK at Chepauk:
Gautam Gambhir
Nitish Rana
AJINKYA RAHANE* 💜 pic.twitter.com/lYWS1Lo5GG— KolkataKnightRiders (@KKRiders) April 11, 2025
यावेळी चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली पण परिस्थिती बदलली नाही आणि संपूर्ण संघ २० षटकांत ९ गडी गमावल्यानंतर फक्त १०३ धावाच करू शकला. चेन्नईची स्थिती यापेक्षाही वाईट होती आणि फक्त ७९ धावांत ९ विकेट पडल्या, पण शेवटी शिवम दुबेने काही मोठे फटके मारले आणि संघाला १०० च्या पुढे नेले. मात्र, असे असूनही, चेपॉकवरील चेन्नईची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. कोलकाताच्या फिरकी त्रिकुटाने ९ पैकी ६ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये सुनील नारायणने ३, वरुण चक्रवर्तीने २ आणि मोईन अलीने १ विकेट्स घेतली.
हेही वाचा – PSL 2025 सुरू होण्यापूर्वीच मोठी दुर्घटना, इस्लामाबादच्या टीम हॉटेलमध्ये लागली भीषण आग
केकेआरचा फक्त ६१ चेंडूत विजय –
चेन्नईचा डाव पाहिल्यानंतर जर कोणाला वाटले की खेळपट्टी संथ आहे आणि फलंदाजी करणे कठीण आहे, तर कोलकाताच्या सलामीवीरांनी हा गैरसमजही दूर केला. क्विंटन डी कॉक (२३) आणि सुनील नारायण यांनी शानदार सुरुवात दिली आणि फक्त चार षटकांत ४६ धावा जोडल्या. सीएसकेसाठी पहिला सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने डी कॉकला बाद केले. पण त्यामुळे काही फरक पडला नाही. कारण केकेआर कर्णधार अजिंक्य रहाणे (नाबाद २०) मैदानात येताच आक्रमक झाला, तर नरेनने चौकार आणि षटकार मारत राहिले. नरेन (४४) अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच बाद झाला परंतु रिंकू सिंग (नाबाद १५) आणि रहाणे यांनी मिळून संघाला फक्त १०.१ षटकांत विजय मिळवून दिला.





