CSK vs GT IPL 2023 Final Live : डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 15 षटकांचा होणार सामना; रात्री 12.10 ला होणार सुरूवात…
Updated On:

अहमदाबाद : पावसामुळेे थांबलेला आयपीएलचा अंतिम सामना रात्री 12.10 वाजता सुरू होणार आहे.
डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईसमोर 15 षटकात 171 धावांचे लक्ष्य आहे. चेन्नईने आतापर्यंत तीन चेंडूत चार धावा केल्या आहेत. त्यानुसार चेन्नईला 87 चेंडूत 167 धावांची गरज आहे.
तत्पूर्वी, साई सुदर्शन याच्या झंझावाती 96 धावांच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबद्लयात 214 धावांपर्यंत मजल मारली. साई सुदर्शनशिवाय वृद्धीमान साहा याने 54 धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून मथिशा पथीराना याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
टॅग्स:





