IPL Final 2023 GT vs CSK Live : चेन्नईने टाॅस जिंकला, कर्णधार धोनीने घेतला ‘हा’ निर्णय…

अहमदाबाद :- आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत आज गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना चार वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. हा सामना रविवारीच होणार होता. मात्र, 28 मेचा दिवस पावसाने वाया गेला. आता हा सामना आज राखीव दिवशी खेळला जात आहे.
चेन्नई vs गुजरात याच्यांतील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(टाॅस) कौल हा चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार एमएस धोनी याने क्षेत्ररक्षण स्विकारताना गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीस पाचारणं केलं आहे.
दरम्यान, चेन्नई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत एकूण चार सामने झाले आहेत. यापैकी गुजरातने तीन आणि चेन्नईने केवळ एकच सामना जिंकला आहे. गेल्या मोसमात या दोघांमध्ये दोन सामने झाले, त्या दोन्हीमध्ये गुजरात संघाने बाजी मारली. त्याचबरोबर या मोसमात दोन सामने खेळले गेले.
मोसमातील सलामीच्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यात हार्दिकच्या संघाने विजय मिळवला होता. त्याचवेळी क्वालिफायर-1 मध्ये चेन्नईने गुजरातचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.





