Ravindra Jadeja : सीएसकेने जड्डूचा ‘तो’ VIDEO पोस्ट केल्याने उडाली खळबळ! नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Ravindra Jadeja’s video shared by CSK : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यास आणि खेळाडूंच्या लिलावाला (ऑक्शन) अजून बराच वेळ असला तरी, सोशल मीडियावर आयपीएल फ्रँचायझींची सक्रियता कायम आहे. अशात आता सीएसके फ्रँचायझींने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा एक व्हिडिओ पोस्ट करून क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय आणि त्याची इतकी चर्चा का होत आहे? जाणून घेऊया.
व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय?
सीएसकेने ७ नोव्हेंबर रोजी आपल्या इन्स्टाग् आणि ‘एक्स’ अकाउंटवर रवींद्र जडेजाचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये जडेजा टीम इंडियाच्या किंवा सीएसकेच्या जर्सीत नाही. तो साधा शर्ट आणि जीन्स परिधान केलेला ली असून त्याच्या हातात बॅट आहे. तो ही बॅट तलवारीप्रमाणे फिरवताना दिसत आहे, ज्याप्रकारे तो अर्धशतक किंवा शतक पूर्ण झाल्यावर मैदानात ‘तलवारबाजी’ करत सेलिब्रेशन करतो. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर एका चित्रपटाचा ऑडिओ सुरू आहे.
खळबळीचे कारण काय?
Thalapathy Jadeja is not going anywhere
— abhay singh (@abhaysingh_13) November 7, 2025
सीएसकेने हा व्हिडीओ पोस्ट करताच चाहत्यांमध्ये मोठी खळबळ माजली आणि कमेंट्सचा पाऊस पडला. या व्हिडिओवर चाहत्यांनी इतकी जबरदस्त प्रतिक्रिया का दिली? याचे कारण आहे, आयपीएल लिलावापूर्वी सुरू असलेल्या खेळाडूंच्या ट्रेड (Trade) बाबतच्या जोरदार चर्चा आणि अफवा!शुक्रवारीच एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, संजू सॅमसनला ट्रेड करण्याबाबत आरआर आणि सीएसकेमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या रिपोर्टमध्ये हे देखील म्हटले होते की, सीएसके आपला एका मोठा खेळाडू देऊन सॅमसनला ट्रेड करण्यासाठी तयार आहे.
जडेजाच्या ट्रेडची अटकळ –
या रिपोर्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी, काही अन्य माध्यमांनी रवींद्र जडेजा हा संभाव्य खेळाडू असू शकतो, अशी शक्यता वर्तवली होती. या चर्चा समोर आल्याच्या काही वेळेतच सीएसकेने जडेजाचा हा ‘तलवारबाजी’ व्हिडीओ पोस्ट करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या पोस्टमध्ये ट्रेडबद्दल कोणताही उल्लेख नसला तरी, सोशल मीडिया यूजर्स या पोस्टला एक संकेत मानत आहेत. चाहत्यांच्या मते, सीएसकेने हा व्हिडिओ पोस्ट करून स्पष्ट केले आहे की, ते आपल्या स्टार अष्टपैलू खेळाडूला दुसऱ्या संघात ट्रेड करण्यासाठी तयार नाहीत आणि जडेजा पुढेही याच फ्रँचायझीचा महत्त्वाचा भाग राहील.
हेही वाचा – Indian Women Team : विश्वविजेत्या महिला संघाला दिली जाणारी Sierra SUV कार कशी असणार? जाणून घ्या
आता पुढे काय?
सॅमसन आणि जडेजाच्या ट्रेडची अटकळ ही काही पहिली वेळ नाही. काही महिन्यांपूर्वीही अशा चर्चा रंगल्या होत्या, परंतु त्यावेळी चेन्नईने जडेजाला ट्रेड करण्याची राजस्थानची मागणी फेटाळून लावली होती. आता पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या आहेत. आयपीएल रिटेन्शन विंडो बंद होण्यापूर्वी आणि लिलावाच्या दिवसापर्यंत काहीही बदल होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात या ट्रेड प्रकरणाबद्दल उत्सुकता कायम राहील.





