Dewald Brevis Injured : सीएसकेला मोठा धक्का! धोनीनंतर आता ‘हा’ मॅचविनर खेळाडूही दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर
Dewald Brevis Injured : माजी कर्णधार एमएस धोनीपाठोपाठ आता संघाचा आणखी एक स्फोटक फलंदाज दुखापतीमुळे बाहेर पडल्याने 'यलो आर्मी'ला मोठा धक्का बसला आहे.

Dewald Brevis Injured ahead RR vs CSK match in IPL 2026 : आयपीएल २०२६ मधील आपल्या पहिल्या सामन्यात सोमवारी (३० मार्च) चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी सीएसकेला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. महेंद्रसिंग धोनी पोटरीच्या दुखापतीमुळे आधीच दोन आठवडे बाहेर असताना, आता युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस देखील ‘साइड स्ट्रेन’ मुळे सलामीच्या सामन्यातून बाहेर पडला आहे.
प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनी दिली माहिती –
चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फ्लेमिंग म्हणाले, “डेवॉल्ड ब्रेव्हिस दुखापतीमुळे बाहेर आहे. सराव सत्रादरम्यान त्याला दुखापत झाली होती आणि तो सध्या त्यातून सावरत आहे.” ब्रेविसच्या अनुपस्थितीमुळे चेन्नईच्या मधल्या फळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तथापि, धोनी संघासोबत सक्रिय असून तो रणनीती आखण्यात मदत करत असल्याचेही फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले.
Both injured 😔 #DewaldBrevis #MSDhoni #CSKvsRR pic.twitter.com/eOD9u2kbrc
— the_inzu (@inzamamAhmad92) March 29, 2026
संजू सॅमसन आणि ऋतुराजवर मदार –
🚨INJURY CRISIS IN CSK CAMP🚨
– Dhoni likely to miss first 6 games. [TOI]
– Brevis likely to miss first 2-3 games. [RevSportz]
– Spencer likely to miss first 6-7 games.
– Ellis Ruled out.#mahi #dewaldbrevis #chennaisuperkings #dhoni #csk pic.twitter.com/RB21iiW6OZ
— Suryansh Pandey (@Suryansh__64) March 29, 2026
यंदाच्या हंगामात चेन्नईने आपल्या रणनीतीत बदल केला असून संघात संजू सॅमसन सारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूचा समावेश केला आहे. फ्लेमिंग यांनी संजूच्या येण्याबाबत उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, “संजूचे संघात येणे ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. गेल्या वर्षी ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे आमचे संतुलन बिघडले होते, पण यंदा फिट ऋतुराज आणि फॉर्मात असलेला संजू आमची ताकद वाढवतील.”
राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात करणे महत्त्वाचे असल्याचे सांगत फ्लेमिंग यांनी उर्वरित खेळाडूंना जबाबदारीने खेळण्याचे आवाहन केले आहे. धोनी आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस नसताना चेन्नईची प्लेइंग-११ कशी असेल, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





