CSK vs PBKS : पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर सीएसकेच्या सीईओंनी धोनीशी केली चर्चा, VIDEO होतोय व्हायरल

MS Dhoni and CSK CEO video goes viral after CSK vs PBKS match : पाच वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जला ३० एप्रिल रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्जकडून दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवासह, चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडली आहे. मात्र, या पराभवापेक्षाही, सामन्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये कर्णधार धोनी आणि संघाचे सीईओ काशी विश्वनाथन एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.
सामन्यानंतर धोनी सीईओशी बोलताना दिसला –
सीएसकेचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, पुन्हा एकदा संघाची धुरा धोनीच्या आली. मात्र, तरी तो सीएसकेला प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडण्यापासून रोखू शकला नाही. ३० एप्रिल रोजी चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून ४ विकेट्सने पराभव पत्करल्याने सीएसके संघा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. सामन्यानंतर एमएस धोनी काशी विश्वनाथनशी बोलताना दिसला.
Csk ceo clapping to dhoni pic.twitter.com/iiIJJaEobJ
— Pappu Plumber (@tappumessi) April 30, 2025
नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यानंतर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणारा ४३ वर्षीय एमएस धोनी चेन्नईला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्यापासून वाचवू शकला नाही. ३० एप्रिल रोजी चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून ४ विकेट्सने पराभव पत्करल्याने सीएसक संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. या सामन्यात धोनीने चार चेंडूंचा सामना केला आणि एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११ धावा केल्या.
हेही वाचा – Shreyas Iyer : सीएसकेविरुद्धच्या विजयानंतर श्रेयसला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने ठोठावला दंड
या सामन्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्याशी बोलताना दिसत आहे. या संभाषणादरम्यान तो खूप आनंदी दिसत होता. या संभाषणाबाबत चाहते सोशल मीडियावर विविध अंदाज लावताना दिसत आहेत.
हेही वाचा – RR vs MI : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! स्टार खेळाडू IPL 2025 मधून पडला बाहेर
सामन्यापूर्वी धोनीने केले होते धक्कादायक वक्तव्य –
खरं तर, पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी, टॉस दरम्यान, चाहत्यांच्या गोंधळात डॅनी मॉरिसनने एमएस धोनीला विचारले, “स्वागत पहा. याचा अर्थ असा आहे की तुम्ही पुढच्या वर्षीही परत येत आहात का?” यावर उत्तर देताना एमएस धोनी म्हणाला, “सध्या मला माहित नाही की मी पुढचा सामना खेळेन की नाही.”





