CSK’s Announcement : चेन्नई सुपर किंग्सची मोठी घोषणा ! भारताच्या ‘या’ माजी खेळाडूची संघाच्या हेडकोचपदी नियुक्ती
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आणि तब्बल पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघात (CSK's Announcement) एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे.

CSK’s Announcement : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आणि तब्बल पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघात (CSK’s Announcement) एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे.
आयपीएल २०२४ नंतर चेन्नई संघ (CSK’s Announcement) आणि त्यांचे यशस्वी मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा मोठा निर्णय घेतला होता. तब्बल १८ वर्षांची ऐतिहासिक आणि अविस्मरणीय साथ संपल्यानंतर, आता पिवळ्या जर्सीच्या संघाचा मुख्य सूत्रधार कोण असणार, याबाबत क्रीडा जगतात प्रचंड उत्सुकता आणि चर्चांना उधाण आलं होतं. अखेर चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर अधिकृत घोषणा करत या सस्पेन्सवरून पडदा उठवला असून चाहत्यांची उत्सुकता संपवली आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची (CSK’s Announcement) धुरा आता भारताच्या एका दिग्गज खेळाडूच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. टीम इंडियाचा माजी स्टार वेगवान गोलंदाज झहीर खान आता चेन्नई सुपर किंग्सचा नवा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) म्हणून मैदानात रणनीती आखताना दिसणार आहे. सोमवारी फ्रँचायझीने सोशल मीडिया पोस्टद्वारे या नव्या प्रवासाची अधिकृत घोषणा केली.
चेन्नईच्या ताफ्यात दाखल होण्यापूर्वी झहीर खानने २०२५ च्या आयपीएल हंगामात लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाचा मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मात्र, केवळ एका हंगामानंतर त्याने ते पद सोडले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या धारदार गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणाऱ्या झहीर खानने भारतासाठी ९२ कसोटी, २०० एकदिवसीय आणि १७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, भारताने जिंकलेल्या ऐतिहासिक २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात झहीर खानने तब्बल २१ विकेट्स घेत मोलाची भूमिका बजावली होती आणि तो भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. आता हाच वर्ल्डकप हिरो ‘कॅप्टन कूल’ धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला (CSK’s Announcement) यशाच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी सज्ज झाला आहे.






