#T20WorldCup | ऑस्ट्रेलियाने ४२ धावांनी सामना जिंकला, पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर!

T20 WorldCup – ब्रिस्बेन येथील मैदानावर खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या ३१व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा ४२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आयर्लंडसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ १३७ धावांवर सर्वबाद झाला. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार अॅरॉन फिंचच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ५ गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंचने ४४ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या. मार्कस स्टॉइनिसनेही मोठे फटके खेळात ३५ धावांचे योगदान दिले.
व्हिडिओ लीक प्रकरणी हॉटेल प्रशासनाने मागितली विराटची माफी, दोषींवर कारवाई!
सामान्यच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून आयर्लंड संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यजमानांची सुरुवात अत्यंत खराब झाली. डेव्हिड वॉर्नर ( ३ धावा ) लवकरच बाद झाला. यानंतर मिचेल मार्श ( २८ धावा ) आणि कर्णधार फिंचने ( ६३ धावा ) भागीदारी करत डावाला सावरले. ग्लेन मॅक्सवेल ( १३ धावा ) करून बाद झाला. यानंतर मार्कस स्टॉइनिसनेही मोठे फटके खेळात ३५ धावांचे योगदान दिले. तर मॅथ्यू वेड ( ७ धावा ) आणि टिम डेव्हिड ( १५ धावा ) यांनी संघाला १७९ पर्यंत पोहोचवले.
नेदरलँड्सकडून बॅरी मॅकार्थीने दमदार गोलंदाजी करत सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय जोशुआ लिटलने २ खेळाडूंना बाद केले. तर नेदरलँड्सच्या फलंदाजीत लॉर्कन टकरने आपल्या संघासाठी एकाकी संघर्ष केला पण त्याला इतर कोणत्याही खेळाडूची साथ मिळाली नाही. यष्टिरक्षक फलंदाज टकरने ४८ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या. त्याच्याशिवाय आयर्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नाही.
Australia complete a fine win to keep semi-final hopes alive 💪#T20WorldCup | #AUSvIRE | 📝: https://t.co/CW4eQlDZGZ pic.twitter.com/WdUP4gLfZE
— ICC (@ICC) October 31, 2022
त्याचबरोबर सुपर-१२ मधील गट-१ च्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाने ५ अंकांसह चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यांनी २ सामन्यात विजय मिळवला असून १ सामना गमावला तर १ सामना अनिर्णित राहिला आहे. या गुणतालिकेत न्यूझीलंड संघ ५ अंकांसह पहिल्या स्थानी आहे. त्यांनी स्पर्धेत अजून एकही सामना गमावलेला नाही.





