मोठी दुर्घटना..! अहमदनगरमध्ये CRPF जवानांचा ट्रक कालव्यात कोसळला; परिसरात एकच खळबळ
CRPF Acciden : श्रीनगरच्या अहमदनगर (डगपोरा-उमरहैर रोड) भागात सीआरपीएफच्या बुलेटप्रूफ वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.

CRPF Acciden : श्रीनगर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) बुलेटप्रूफ वाहनाचा भीषण अपघात झाला. अहमदनगर परिसरातील डगपोरा-उमरहैर रोडवर वाहन अनियंत्रित होऊन कालव्यात कोसळल्याने ९ जवान जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून जखमी जवानांना वाहनातून बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
या बुलेटप्रूफ वाहनात एकूण ९ जवान प्रवास करत होते. सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीने कालव्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सुरक्षाविषयक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.




