CJP Protest : “सरकार जर आमच्या मुख्य मागण्यांकडे कानाडोळ करेल तर…”; CJP चा केंद्र सरकारला थेट इशारा
CJP Protest : आज पुन्हा एकदा केंद्र सरकारसोबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

CJP Protest : काल केंद्र सरकारसोबत कॉक्रोच जनता पार्टीच्या द्विसदस्यीय शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंग यांच्यासोबत CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी चर्चा केली. आज पुन्हा एकदा केंद्र सरकारसोबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (CJP Protest)
अशातच CJP ने केंद्र सरकारला मोठा इशारा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी वेळकाढूपणा केला तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. आमच्या मुख्य मागण्यांकडे कानाडोळ करेल तर मग संघटनेला आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय नसेल, असं CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी स्पष्ट केलं आहे. (CJP Protest)
आतापर्यंत जितक्या वेळी केंद्र सरकारसोबत चर्चा झाली. त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील काही मागण्या मान्य करण्यावर सकारात्मकता दाखवली आहे. नुकसान भरपाई आणि कायदेशीर प्रकरणात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, अशी महत्वाची माहिती आशुतोष रांका यांनी दिली. (CJP Protest)
पण केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. याच मागणीवर आंदोलनकर्ते ठाम असून मागे हटायला तयार नाहीत. यामुळे सरकारची देखील मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे आज जर केंद्र सरकारसोबत कॅाक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांची बैठक झाली, तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेतला जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. (CJP Protest)
अंतिम जबाबदारी ही शिक्षणमंत्र्यांची (CJP Protest)
केंद्र सरकारने नीट पेपरफुटीची जबाबदरी स्विकारली असून, दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार सरकारने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमधील (NTA) ४७ अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व प्रकरणाची अंतिम जबाबदारी ही शिक्षणमंत्र्यांची आहे. कारण NEET प्रश्नपत्रिका फुटली आणि त्यानंतर देशात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.





