Satara | म्हासुर्णेमध्ये आमदारांकडून कोट्यवधींची विकासकामे

म्हासुर्णे, (प्रतिनिधी)- कराड उत्तर मतदारसंघातील पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील म्हासुर्णे गावातील विविध विकास कामांसाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत.
या भागातील सार्वजनिक रस्ते, मंदिर सभागृह, साकव व इतर विकासकामांसाठी आमदारांनी निधीची कधीच कमतरता भासू दिली नाही, असे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पत्नी सौ जयमाला पाटील यांनी म्हासुर्णे येथील सदिच्छा भेटी प्रसंगी सांगितले.
खटाव पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेखा घार्गे, कल्पना माने, संध्या सरकाळे, आशा वायदंडे, वासंती जाधव, मेघा जाधव, अश्विनी माने, सुजाता माने, विजया जाधव, शोभा वायदंडे, शबनम आतार, शबनम तांबोळी व म्हासुर्णेमधील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
यावेळी सौ. जयमाला पाटील यांनी महिलांच्या विविध अडचणी व प्रश्न जाणून घेतले व आमदार बाळासाहेब पाटील यांच्यामार्फत हे सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही महिलांना दिली. येथील महिलांच्यावतीने सौ. जयमाला पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन महादेव माने, सोसायटी चेअरमन दादासो कदम, शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन किसन माने, सेक्रेटरी पांडुरंग माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, सचिन शिंदे, दत्तात्रय वाठारकर, विठ्ठल यमगर, सोसायटी संचालक चंद्रकांत माने, प्रभाकर माने, अधिक माने, जगन वायदंडे, माजी उपसरपंच विठ्ठल माने, नामदेव माने,
मारुती माने, आण्णासो माने, प्रणव माने, सलीम तांबोळी, अंकुश सरकाळे, आप्पासो निकम, गुलाब वायदंडे, मुस्तफा तांबोळी, तुळशीराम माने, अजय माने, विठ्ठल आप्पा, हरिदास यमगर, आर. जी. कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, शंकर माने, संतोष पाटील, सुखदेव गायकवाड, प्रकाश तुपे, विनोद फाळके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





