Pune District : पिके करपली; जानाई योजनेतून पाणी द्या

नायगाव : पाण्याअभावी जळून चाललेली पिके, विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. अनेक तलाव, बंधारे, तळी कोरडी आहेत. यामुळे पाण्याचीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे हक्काचे पाणी मिळत नसल्याने पुरंदर व बारामती तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी जानाई योजनेतून पाणी मिळावे, अशी आर्त हाक दिली आहे.
पुणे येथील सिंचन भवनातील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अधिकारी श्वेता कुन्हाडे, जानाई योजनेचे कार्यकारी अभियंता ए. आर. शेटे यांची पुरंदर-बारामतीतील शेतकर्यांनी सोमवारी (दि. 9) भेट घेत जानाई योजनेचे पाणी मिळावे आशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. जानाई योजनेच्या पाण्यावर शेतकर्यांची ऊस, गहू, कांदा, ज्वारी, हरभरा आदी पिके अवलंबून आहेत.
तर या परिसरातील शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय करत आहेत व जनावरांसाठी लागत असलेला चारा शेतात घेत असल्याने सध्या पाणी कमी पडू लागल्याने हा चारा पाण्याअभावी जळून जाऊ लागला आहे. त्यामुळे बारामती व पुरंदर तालुक्यातील गावांना जानाई योजनेचे पाणी मिळावे आशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
यावेळी पोपटराव खैरे, ज्ञानेश्वर कौले, इर्षा भगत, धनंजय खैरे, दशरथ चौँडकर, प्रदीप खेसे, सदाशिव चौंडकर, चंद्रकांत चौंडकर, बाळुकाका भगत, विपुल भगत,सत्यवान भगत,गणेश भगत,रामदास भगत, सत्यवान भगत, मोहन भगत, रमेश साळुंके, सुनील नेवसे, प्रकाश काळखैरे, संतोष काटे, महेश गायकवाड, संपत कुतवळ, सचिन साळुंखे आदी उपस्थित होते.
येत्या 18 डिसेंबरपासून जानाई योजनेचे आवर्तन देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वरवंड तलावामध्ये पाणी घेण्यात येणार आहे. बारामती व पुरंदरमधील मागणीनुसार पाण्याचे आवर्तन देण्याचे नियोजन आहे. तसेच या योजनेकरिता 450 कोटी मंजूर झाले आहेत. त्यात काही त्रुटी निर्माण झाल्या होत्या. त्या त्रुटी लवकरच दुरुस्त करून रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आहे.
पृथ्वीराज फाळके, अधीक्षक अभियंता, कृष्णा खोरे विकास महामंडळ





