Cristiano Ronaldo : रोनाल्डोने 1 अब्ज आकड्यासह सोशल मीडियावर रचला इतिहास; चाहत्यांच्या जोरावर मिळवले मोठे यश…

Cristiano Ronaldo creates history on social media : प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने क्रीडा जगतात एक नवा विक्रम रचला आहे. रोनाल्डोने सोशल मीडियावर एक अब्ज फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. एक अब्ज फॉलोअर्स असलेला रोनाल्डो जगातील पहिला ॲथलीट ठरला आहे.
अल नासर क्लबचा स्ट्रायकर रोनाल्डोने अलीकडेच त्याच्या कारकिर्दीतील 900 वा गोल केला आणि चाहत्यांचे प्रचंड समर्थन केल्याबद्दल आभार मानले. यामुळेच आता रोनाल्डोने फॉलोअर्सच्या बाबतीत मोठे स्थान गाठले आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोनाल्डोचे एकत्रितपणे 1 अब्ज पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. तो हा मोठा टप्पा गाठणारा केवळ जगातील पहिला ॲथलीटच नाही तर पहिला व्यक्तीही ठरला आहे.
चाहत्यांचे मानले आभार…
रोनाल्डोने याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर 1 अब्ज फॉलोअर्सची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. रोनाल्डोने लिहिले आहे की, “आपण इतिहास घडवला आहे. 1 अब्ज फॉलोअर्स! ही केवळ संख्या नाही – ती सामायिक उत्कटता, प्रेरणा आणि खेळाबद्दल आणि त्यापलीकडे असलेल्या प्रेमाचा पुरावा आहे.”
अशी कृतज्ञता व्यक्त करताना रोनाल्डो म्हणाला की, मदीराच्या रस्त्यांपासून ते जगातील सर्वात मोठ्या स्टेजपर्यंत तो नेहमीच त्याच्या कुटुंबांसाठी आणि तुमच्यासाठी (चाहत्यांसाठी) खेळला आहे आणि आता त्यांच्यापैकी 1 अब्ज लोक माझ्यासोबत एकत्र उभे आहेत. प्रत्येक चढ-उतारात तूम्ही माझ्या सोबत राहिला आहात. हा प्रवास आपला प्रवास आहे आणि आपण मिळून दाखवून दिले आहे की आपण काय साध्य करू शकतो याला मर्यादा नाहीत.
We’ve made history — 1 BILLION followers! This is more than just a number – it’s a testament to our shared passion, drive, and love for the game and beyond.
From the streets of Madeira to the biggest stages in the world, I’ve always played for my family and for you, and now 1… pic.twitter.com/kZKo803rJo
— Cristiano Ronaldo (@Cristiano) September 12, 2024
रोनाल्डोने पुढे लिहिले आहे की, “माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि माझ्या जीवनाचा एक भाग असल्याबद्दल धन्यवाद. सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे, आणि आपण पुढे जात राहू, जिंकत राहू आणि एकत्र इतिहास घडवत राहू.”
नुकतेच YouTube चॅनल केले होते लाँच…
वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रोनाल्डोच्या फॉलोअर्सच्या संख्येबद्दल सांगायचे तर, इंस्टाग्रामवर 600 दशलक्षाहून अधिक लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत तर फेसबुकवर 100 दशलक्षाहून अधिक लोक त्याला फॉलो करतात. रोनाल्डोचे फेसबुकवर 170 दशलक्ष आणि यूट्यूबवर 60 दशलक्ष सब्सक्राइबर आहेत. विशेष म्हणजे त्याचं यूट्यूब चॅनल या महिन्याच्या सुरुवातीला सुरू करण्यात आलं होतं. त्याच्या सब्सक्राइबरांची संख्या पहिल्याच दिवशी 15 दशलक्ष आणि पहिल्या आठवड्यातच 50 दशलक्ष पर्यंत पोहचली होती.





